कोरची
तालुका मुख्यालयापासुन अंदाजे ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलिस स्टेशन कोटगुल येथे शासनस्तरावरुन लोकोपयोगी योजना पोहचविण्यासाठी आझादी का अमृतमहोत्सव व महाराजस्व अभियान कार्यक्रम शुक्रवारी ०६ मे ला आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विविध प्रकारचे ८६२ दाखले लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन कुरखेडा उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून कोरची तहसीलदार सी आर भंडारी,कृषी अधिकारी लाकेश कटरे,कोटगुल पोलिस स्टेशन अधिकारी आनंद जाधव,माजी पंचायत समिती सभापती श्रावनकुमार मातलाम,सरपंच परमेश लोहंबरे,प्रतिष्ठित व्यापारी चंदन शेखावत व तलाठी,कोतवाल,महसूल कर्मचारी व कोटगुल परिसरातील हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमामध्ये जातीचे दाखले ३१, उत्पन्नाचा दाखला ३६, अधिवास दाखला १४ , नॉन क्रिमीलेयर दाखला ०१, सातबारा ३५७, वनहक्क पट्टे २९० , राशन कार्ड ३१ , आधार कार्ड २०, घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप प्रत्येकी ०५ ब्रास ०७ , इतर दाखले १०५ , पीक कर्ज अर्ज प्राप्त ५०, संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज प्राप्त ०८ असे एकूण ८६२ दाखले वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे संचालन मंडळ अधिकारी धाईत यांनी तर आभार तलाठी किरण साळवे यांनी मानले.