भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात “लिंग संवेदना” या विषयावरील 30 तासांचा प्रमाणपत्र कोर्स विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. स्त्री पुरुष समानता, परस्पर सन्मान, विविध कायदे या विषयावर भर देण्यात आलेला हा कोर्स विद्यार्थ्यांमधे सकारात्मक जाणीव निर्माण करणारा ठरला. यामधे 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ उमाटे यांनी अध्यक्षीय भाषणातून “स्त्री विषयक कायदे आणि समाजातील निकोप वातावरण” या विषयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. प्रमाणपत्र कोर्स च्या समन्वयक डॉ ज्योती राखुंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी सौरभ चामाटे आभारप्रदर्शन आनंद पंडिले यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.