कोरची
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची येथे दिनांक 21 एप्रिल रोज गुरुवार ला शाळा पुर्व तयारी अभियान मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिष अग्रवाल हे होते तर उद्घाटक श्रीदेवी सहारे ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणुन गिरवर देवांगन,सुर्यकांत भैसारे,राम सरकार,कोमल बांबोळे,सुनंदा मुंगमोडे उपस्थित होते.
कोरची पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यशवंत टेंभूर्णे यांनी मेळाव्याला आकस्मिक भेट देऊन मेळाव्याविषयी समाधान व्यक्त केले. सात काऊंटर चे स्टाल लावण्यात आले होते. प्रत्येक बालकांना ठेवलेल्या वस्तू दाखवण्यात आले. त्यावरून त्याच्या सुप्त गुणांची चाचपणी करण्यात आली. बालक व पालकांचे स्वागत करण्यात आले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक अरविंद टेंभूरकर यांनी शाळा पूर्व तयारी अभियान मेळाव्याची संकल्पना आणि उद्देश सांगितले.
कांता साखरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर मारोती अंबादे यांनी पाहुण्यांचे आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी अरविंद टेंभूरकर मुख्याध्यापक, प्रमोदिनी काटेंगे, हेमलता तितीरमारे, कांता साखरे, महेश जाळे, मारोती अंबादे, विनोद भजने यांनी परिश्रम घेतले. माजी विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांचे काम केले. अंगणवाडी सेविका बसंती अंबादे, मंदा शेंडे, लता मडावी, सगुना कुमरे यांनी स्वयंसेवकांचे काम यशस्वीपणे पार पाडले. राकेश मोहूर्ले समन्वयक गटसाधन केंद्र कोरची यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. या मेळाव्याला कोरची येथील बहुसंख्य नागरिक व पालक उपस्थित होते.