अहेरी : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना, भाजपचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी अहेरी विधानसभा क्षेत्राला भेट दिली. यावेळी त्यांनी वनवैभव मंडळाचे सचिव बबलू हकीम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत त्यांच्याशी संवाद साधला.
प्राचार्य सर्फराज आलम यांच्या पुढाकारातून ही भेट घडून आली.
या भेटीदरम्यान आ. भांगडिया आणि बबलू हकीम यांच्यात विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली. यावेळी प्राचार्य सर्फराज आलम उपस्थित होते. भेटीमुळे उपस्थितांमध्ये स्नेहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध मान्यवरांच्या भेटीगाठींना महत्त्व प्राप्त होत असताना, अहेरीतील या भेटीने लक्ष वेधले. सामाजिक व सार्वजनिक जीवनात कार्यरत व्यक्तींमधील संवाद आणि परस्परसंबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही सदिच्छा भेट महत्त्वपूर्ण ठरली.










