वरोरा :- दि. २० मार्च २०२२ रोज रविवारला स्थानिक आलिशान सेलिब्रेशन येथे सन १९८४-८५ ला ईयत्ता १० वी ला लोकमान्य विद्यालय वरोरा येथे शिकणा-या विद्यार्थ्यांनी तब्बल ३६ वर्षानंतर पुन्हा एकत्र येत एक आगळे वेगळे बालमित्र स्नेह संम्मेलन घडवून आणले . या सोहळ्यात सहभागी सर्व विद्यार्थी जवळ पास पन्नाशी ओलांडलेले आणि या सोहळ्यात ज्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला असे सर्व गुरुजन ८० ते ८५ च्या दरम्यान होते .
ईतक्या प्रदिर्घ कालावधी नंतर निश्चितच त्यावेळी या बॕचला शिकविणारे बरेच गुरुजन जे आज आपल्या सोबत नाहीत अशा सर्व गुरुजनांना व १९८४-८५ तुकडी मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी दिवंगत झाले आशा सर्व विद्यार्थ्यांना दोन मिनीट श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरवात झाली . गुरुजनांपैकी अडोणी , सातपुते , शिरभैये , नामजोशी , दातारकर , नावलेकर , तडस , निमजे ,मुडे , दुर्गे व कावलकर सर या वेळी उपस्थित होते .
पहिल्या सत्रात ३६ वर्षानंतर परत पुन्हा एकमेकांना भेटणारे वर्गमित्र ज्यांच्यामध्ये कमालीचा बदल झालेला होता त्यांनी चहा नाश्त्या सोबत एकमेकांशी आपापला परिचय करुन घेतला . नियोजनाप्रमाणे अगदी १२-०० वाजता शिक्षक सन्मान सोहळ्याला सुरवात झाली . अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा सोहळा पार पडला . या सोहळ्यासाठी उपस्थित ७४ वर्गमित्रां पैकी सर्वच विद्यार्थ्यांकडे ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून जबाबदारीचे वाटप करण्यात आले होते . प्रत्येक गुरुजनांचा सन्मान करण्यासाठी सहा सहा विद्यार्थ्यांची टीम बनविल्या गेली होती व प्रत्येकाकडेच काहीतरी जबाबदारी होती . शिक्षकांचा कुंकुम तिलक , मोत्याची माळ , शाॕल , श्रीफळ , सन्मान चिन्ह व भेटवस्तू देवून सन्मान होत असतांना मुकेश पारख हा प्रत्येक शिक्षकांचे मनोगत स्वतः आपल्या शब्दात मांडत होता . सर्व शिक्षकवृंद असा आगळावेगळा सन्मान पाहून भावुक झाले होते .संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मुकेश पारख , गोपाळ गुडधे , संजय पाम्पट्टीवार , महेश डोंगरे , प्रविण मालू , गोपाल वरुडकर , अजय गुप्ता , अनिल भडगरे , सतीश मशारकर , संजय घोडे , मनिष गोलेच्छा यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुकेश पारख यांनी केले
या वेळी मुंबई , पुणे , कर्नाटक , हुबळी , छत्तीसगढ , नागपूर , यवतमाळ , चंद्रपूर व वरोरा येथून संपूर्ण देशभरात आपलं कर्तृत्व गाजवणारे वर्ग मित्र उपस्थित झाले होते . ईतक्या वर्षानंतर आपल्या वर्गमित्राला बेंचमेटला परत भेटतांना चा आनंद शब्दात व्यक्त करताच येणार नाही . प्रत्येकाच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता . असा सोहळा दरवर्षी व्हावा असे प्रत्येकाला वाटत होते . शेवटी काही वर्गमित्रांनी आपल्या मनोगतातून यापुढेही आपण अशा प्रकारचे आयोजन करावे अशी सूचना केली . काही मनोरंजनात्मक कार्यक्रमही घेण्यात आले .