गडचिरोली:- सतत सुरू असलेल्या पावसामुळे विविध रस्त्यावर झुकलेल्या धोकादायक झाडांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.असाच प्रकार मुलचेरा ते बोलेपल्ली मार्गावर एक झाड अगदी डोक्याला लागण्याइतके झुकले होते.या झुकलेल्या झाडामुळे रहदारीला अडचण निर्माण झाली होती अखेर प्रशासनाने त्वरित दखल घेऊन झाड हटविले.
मुलचेरा ते एटापल्ली रस्त्यावर गट्टा,देवदा,हेटळकसा,बोलेपल्ली,चंदनवेली,गेदा,पुलीगुडमसह आदी गावांचा समावेश आहे. शिवाय एटापल्ली तालुक्यातील नागरिकांचा देखील आज रस्त्याने ये जा सुरू असते. सतत सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर काही ठिकाणी झाडं झुकली होती. त्यामुळे रहदारीला अडचण निर्माण झाली होती शिवाय अपघाताची शक्यता देखील बळावली होती.ही गोष्ट मुलचेरा चे तहसीलदार चेतन पाटील यांना लक्षात येताच त्यांनी महसूल आणि पेडीगुडम वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांना पाठवून ती धोकादायक झाड हटविले.
त्यामुळे मुलचेरा ते एटापल्ली रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. यावेळी तलाठी रितेश चिंदमवार,क्षेत्र सहाय्यक पी एम वडेट्टीवारसह आदी कर्मचारी उपस्थित होते.