मूल प्रतिनिधी रोहित कामडे
शहरात वाढत असलेल्या अपराधान वर अंकुश लावण्याच्या उद्देशाने मूल नगर परिषदचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांच्या नेतृत्त्वात सामाजिक कार्यकर्तेनी मिळून पोलिस निरीक्षक व उप विभागीय पुलिस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले
मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणात बाल वयात नशा घेण्याचे प्रमाण वाढत आहे. वेग वेगळ्या अमली पदार्थांचे सेवन करून नशा करण्याचे प्रमाण मूल तालुक्यात वाढत असल्याने भविष्यात मूल तालुक्यात गुंडागर्दीचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अशा नशा घेणाऱ्या अल्पवयीन मुलांवर व अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
मूल तालुक्यात काही गावान मध्ये आणि विशेषत: मूल शहरात काही अल्पवयीन मुले नशेच्या आहारी गेलेले आहेत, वेगवेगळ्या अमली पदार्थांचा वापर करून नशा घेतली जात आहे. शाळकरी मुले फेविकल्स, सोलेशन, व्हाईटनर यासारख्या वस्तूंचाही नशेसाठी वापर करीत असल्याचे दिसुन येत आहे, यामुळें अशा प्रकारे नशा करणाऱ्यांना विविध आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावत आहे.
मूल शहरातील काटवण रोड, कोसंबी रोड, मारोडा रोड, ताडाला रोड, नव भारत शाळा जवळ, कर्मवीर महाविद्यालयाचे पटांगण, रेल्वे स्टेशन परिसरात शाळकरी मुलांसह काही मूल चरस, गांजा, सूटा यासारख्या अमली पदार्थांचे सेवन करून मोठ्या प्रमाणात नशा करीत असताना आढळतात अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले .
निवेदन देताना मूल नगर परिषदचे माजी बांधकाम सभापती प्रशांतभाऊ समर्थ,महेश गाजुलवार, सतीश उशेवार,विवेक मांदडे, विवेक मुत्याल वार, अतुल गोवर्धन, संदीप मोहबे, राकेश मोहूर्ले, नाना आकेवार, रुपेश मारकवार, गिरीश केशवानी, दत्तू समर्थ, लवनिश उधवानी, शेंडे, व सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.