मूल प्रतिनिधी(रोहित कामडे) :-
मुल तालुक्यातील बेंबाळ जुनासुर्ला जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत मौजा कोरंबि येथील शेतकरी कैलास नामदेव गेडाम वय ६१ वर्ष राह.कोरंबी.हे दि. 3 जुलै रोजी आपल्या गावालगत आपल्या शेळ्या मेंढ्या चारत होते,अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्याचेवर हमला केलापरंतु त्या वाघाला न घाबरता त्याचा सामना करून त्या वाघाला पळवून लावले आणि आपला जीव वाचविला,हा जखमी असलेल्या कैलास नामदेव गेडाम यांना बेबाळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रथम उपचार करिता गेले असता तिथून मुल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
तेथील शिवसेनेचे पदाधिकारी गोविंदा नरसपूरे यांनी तत्काळ शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गीऱ्हे तथा शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचेशी भ्रमणधवनीवरून संपर्क करून माहिती दिली,शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार शहर प्रमुख आकाश राम,उपतालुका प्रमुख चेतन मुंगमोडे,विभाग प्रमुख विनोद चलाख,विभाग प्रमुख ऋतिक मेश्राम,ग्रा.पं.सदस्य शरद आत्राम तथा इतर पदाधिकारी तात्काळ रुग्णालयात मदती साठी आपल्या रुग्णवाहिका सोबत पोहचले,आणि जखमी चा उपचार करिता शिवसेना रुग्णवाहिकेने मोफत चंद्रपूर जिल्हा रुग्णालय येथे तात्काळ उपचार करिता हलविण्यात आले.
शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गीऱ्हे यांनी स्वतः जातीने लक्ष घालून त्या जखमी रुग्णाला सर्वतोपरी मदत केली म्हणून कैलास नामदेव गेडाम व त्यांचे परिवातील सर्व नातलग यांनी संदीप गीऱ्हे यांचे आभार मानले.परंतु वनविभाग चे कोणतेही पदाधिकारी आणि कर्मचारी सुध्धा जखमी अशोक नामदवे गेडाम यांचे जवळ हजर नव्हते.वनविभाग आणि शासन प्रशासन जनतेच्या जीवाची किती काळजी करतात हे मात्र या घटनेतून लक्ष्यात आल.