गोंडपीपरी -(सुरज माडूरवार)
शेत शिवारात असलेल्या घोरपडीला पकडून कापण्याचे उद्देशाने आणत असताना दि (२४) सोमवारी वनकर्मचाऱ्यांनी एका आरोपीला अटक केली.
मध्य चांदा वन विभागाच्या धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गोंडपीपरी उपक्षेत्राचे नियतवनक्षेत्र सुकवासी येथील शेतशिवारात घोरपड हे वन्यजीव पाऊस पडल्यानंतर उन्हात बाहेर पडले यावेळी शेतात असणारे रमेश रामटेके राहणार धामणगाव यांच्या नजरेत ती घोरपड दिसली, ती घोरपड कापून खाण्याचे उद्देशाने पकडली आणि घरी आणले.घटनेची गुप्त माहिती वनविभाला मिळाली.धाबा वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव बोबडे यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह आरोपीच्या घरी धाड टाकली असता जिवंत घोरपड आढळून आली. घतनस्थळी पंचनामा करून मुख्य आरोपी रमेश रामटेके यांना घोरपडी सह ताब्यात घेत गुन्हा नोंद करण्यात आला.सदर कारवाई धाबा वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव बोबडे,क्षेत्र सहायक राजेंद्र लडके,जयदेव दत्ता,वनरक्षक अनिल चुदरी, वनमजुर नाजूक निकोडे,दिलीप देव्हाडे,नामदेव घुबडे यांनी केली.