गोंडपिपरी –
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त इंडियन मिलिटरी स्कूल येथील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या एका चमूसह प्राध्यापक प्रवीण शेळके यांचे नेतृत्वात हिमालयातील १३ हजार ३४८ फूट उंचीचे बर्फाच्छादीत फ्रेंडशिप शिखर सर करण्यासाठी रवाना झाली आहे.यात गोंडपिपरी तालुक्यातील आदर्श साईनाथ मास्टे देखील सहभागी होणार असून ही परिसरासाठी आनंदाची बाब आहे.
आदर्शने शिक्षणासोबतच गिर्यारोहणाच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे.त्याने यापूर्वी अनेक लहानमोठ्या शिखराची उंची गाठत तालुक्यासह जिल्ह्याचे नाव उंचावले. नॅशनल टुर्नामेंटमध्ये देखील सहभाग घेतला.त्यातच शेळके यांच्या या धाडसी उपक्रमासाठी खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीमला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.चंद्रपूरचे उपजिल्हाधिकारी देशपांडे व गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी आदर्शला त्याच्या वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.हि मोहिम १७ जूनपासून बेस कॅम्प १,कॅम्प २ आणि सबमिट कॅम्पवर पोहोचत २१ जूनच्या पहाटे शिखरावर दाखल होऊन तरुणांमध्ये योग तथा व्यायामाबद्दल जाणीव आणि जागृती निर्माण केली जाणार आहे.हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश देखील आहे.या मोहिमेत गिर्यारोहक आदर्श मास्टेसह आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक सागर कुंभारे,गिर्यारोहक प्रा.प्रवीण शेळके,आर्यन भदौरिया,समीर सातपुते,तत्त्व धाभाडे,आतिश चारोडे,अक्षय हिवराडे हे युवातरुण सहभागी आहेत.या सर्व सहभागी गिर्यारोहक तसेच प्राध्यापकांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.