चिमूर :- तालुक्यातील शंकरपूर पासून साठगाव मार्गे प्रवाशांना जवळ पडणारा व अत्यंत वर्दळीचा हा मार्ग असून, पाच वर्षापासून साठगाव ते रोहना फाटा या दोन कि. मी रोडची अत्यंत दैनावस्था झाली होती. आता या रोडचे डांबरीकरणाचे काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाची वातावरण पसरले आहे.
नागपूर जिल्ह्यातील भिवापूर हे तालुक्याचे ठिकाण असून या पंचवीस किलोमीटर अंतरामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे चिमूर तालुक्यातील जवळपास 15 गावांचे भिवापूर बाजारपेठे सोबत आर्थिक संबंध जोडलेले आहे. त्यामुळे या रोडला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, दिवसेंदिवस या रोडवरील वर्दळ वाढत आहे.
या दोन वर्षात साठगाव येथील उपसरपंच सौ प्रीतीताई दीडमुठे यांनी डोकेफोड आंदोलन, अनेकदा रोडवर बेशरम ची झाडे लावून तर या रोडवर उपोषणाला बसून आंदोलने केली. तरीही प्रशासनाला जाग आली नाही.
मागील वर्षी उपसरपंच प्रीतीताई दीडमुठे यांनी रोडवर बेशरमची झाडे लावून आंदोलन केले, तेव्हा त्या दिवशी प्रशासनाने जेसीबी पाठवून रोडवरील फक्त खड्डे बुजविण्याचे काम केले. परंतु या दोन कि. मी. रोडचे पक्के बांधकाम करण्यास वेळोवेळी टाळाटाळ केली. या दोन वर्षांमध्ये कितीतरी वेळा उपसरपंच यांनी या रोडच्या बांधकामासाठी संबंधित विभागाला पत्रव्यवहार केला परंतु बांधकाम विभागाला जाग आली नाही.
त्यामुळे उपसरपंच प्रीतीताई दीडमुठे यांनी गावातील नागरिकांना घेऊन दिनांक 18 जून 2024 ला बांधकाम विभाग चिमूर च्या समोर वीस प्राशन करून आत्मदहन करण्याचा इशारा पत्राद्वारे संवर्ग विकास अधिकारी चिमूर तसेच तहसीलदार चिमूर यांना दिला. त्याची दखल घेऊन प्रशासनाने आज दिनांक 16 जूनला सकाळी या रोडच्या डांबरीकरणाचे काम सुरू केले. शेवटी साठगाव येथील उपसरपंच प्रीतीताई दीडमुठे यांनी या रोडच्या कामासाठी वेळोवेळी केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्या या कार्याला यश आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.