गोंडपीपरी:
शहरातील संजो कॉन्व्हेंट मध्ये कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने मावशीची तब्येत बरी नसल्याचे कारण पुढे करत उपचारासाठी पैशाची गरज असल्याचे सांगून त्याच शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासह पालकांकडून पैसे मागून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
एका विद्यार्थीनीने तब्बल सहा तोळे सोने शिक्षकाला दिले.काही दिवसांनी दिलेले सोने परत मागितले असता शिक्षकाने सोने देण्यास टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात येताच विद्यार्थींनीने पालकाच्या सोबतीने गोंडपीपरी पोलीस स्टेशन गाठून फ,सवणूक व विश्वासघात केल्या प्रकरणी दि.(७)बुधवारी तक्रार दाखल केली.तक्रार नोंदवताच पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत आरोपीला चंद्रपुरात अटक केली.आरोपीचे नाव अखिल रोहणकर असून मूळ तो गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील रहिवासी असून अनेक गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे स्थायिक झाला.मागील आठ महिन्यांपासून तो गोंडपिपरी येथील कॉन्व्हेन्ट मधे कार्यरत होता.
गोंडपीपरी येथील
संजो कॉन्व्हेंट ही सिबीएससी पॅटर्न ची शाळा आहे. उत्तम व दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने मुलांच्या उज्जल भविष्यासाठी शहरातील मोठे अधिकारी , विविध विभागातील कर्मचारी , लहान-मोठे व्यावसायिक यासह सधन शेतकऱ्यांची मुले या कॉन्व्हेट मधून शिक्षण घेत आहेत .अखिल रोहणकर यांची संगीत शिक्षक म्हणून संजो कॉन्व्हेंट मध्ये नियुक्ती करण्यात आली. अल्पावधीतच सदर शिक्षकाने विद्यार्थ्यांची मने जिंकली. संगीत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसह पालकात सुद्धा चांगली ओळख झाली. नामांकित शाळेत शिक्षक असल्याचा फायदा घेत रोहनकर यांनी मावशीची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्याने पैशाची नितांत गरज असल्याचे एका विद्यार्थीनिला सांगीतले . घरच्यांना काहीही न सांगता तब्बल सहा तोळे सोने विद्यार्थीनीने शिक्षकाकडे आणून दिले. दरम्यान लवकरच सोने परत करणार असल्याचा विश्वास शिक्षकाने दाखविला. काही दिवसांनी विद्यार्थीनीने शिक्षकाला दिलेले सोने परत मागितले असता सोने देण्यास शिक्षकाने टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे समजून येताच दहावीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने सदर बाब आई वडिलांना सांगितली. लागलीच गोंडपीपरी पोलीस स्टेशन गाठून शिक्षका विरोधात फसवणूक व विश्वासघात केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली. तात्काळ गोंडपीपरी पोलिसांनी दि.८ गुरुवारी आरोपीस चंद्रपुरातून ताब्यात घेत अटक केली. सदर बाब गोंडपीपरी शहरात पसरताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली व अनेकांनी पोलिसात धाव घेतली. कारण काही दिवसापूर्वी असेच कारण पुढे करीत सदर शिक्षकाने अनेक पालकांच्या घरी जाऊन पैसे मागितले.अडचणीत एकमेकांना मदत केली पाहिजे असे म्हणत अनेक पालकांनी आपल्या क्षमतेनुसार पाच हजार, दहा हजार, विस हजार तर काहींनी ५० हजार पर्यंतची रक्कम त्या शिक्षकाला दिल्याचे चर्चतून समोर आले आहे. फसवणूक व विश्वासघात केल्या प्रकरणी गोंडपीपरी पोलिसांनी त्या शिक्षकाला अटक केली. न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले. सदर प्रकरणी पोलिसांकडून ओरोपीची कसून चौकशी व्हावी करीता न्यायालयाने एक दिवसासाठी पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुढील तपास गोंडपीपरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोहर मोगरे करीत आहे.
शहरातील नामवंत कॉनव्हेटचा शिक्षक असल्याने अनेकांनी आपले पाल्य त्या कॉन्व्हेंट मध्ये शिकत असल्याने त्यांना आर्थिक मदत केली .सध्या स्थितीत एकच तक्रार पोलीस स्टेशन येथे दाखल झाली असून फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अनेकांनी पोलीस स्टेशन मधे धाव घेतली .यात त्या शिक्षकाने राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांना देखील फसवल्याची चर्चा आहे.फसवणूक झालेल्यांचे बयान नोंदवणे सुरू असून पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करत आहे