वरोरा प्रतिनिधी
जीवनात खेळाला महत्व देणे अत्यावश्यक आहे. आजच्या संगणकाच्या युगात मुलांचे खेळाकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यासाठी कुठलाही खेळ महत्वाचे असल्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा स्पोर्ट्स फाऊंडेशन वरोरा व लोक शिक्षण संस्था वरोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आंतर जिल्हा हॉलीबॉल स्पर्धेच्या (पुरुष) उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
वरोरा येथे वरोरा स्पोर्टस् फाऊडेषन वरोरा व लोक शिक्षण संस्था वरोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आंतर जिल्हा हॉलीबॉल स्पर्धेचे (पुरुष) आयोजन लोकमान्य महाविद्यालय वरोरा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 1 फेब्रूवारी रोजी पार पडला. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सदर स्पर्धेचा उद्घाटन प्रसंगी मत व्यक्त करतांना सांगितले कि, सध्याचे युग हे संगणकाचे युग असून आजचा युवक हा खेळात मागे पडलेला आहे. यामुळेच आरोग्याच्या वेळोवेळी अडचणी निर्माण होत आहेत. जर आजच्या युवकाने खेळाकडे वळले तर शरीर समृध्दी सोबत आरोग्य आणि जीवन देखील समृध्द होऊ शकते. त्यामुळे आज जास्तीत जास्त युवकाने खेळाचा व्यासंग घेण्याचे आवाहन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन दमदार खेळ खेळावा व खेळ भावनेचा आदर करावा असे मत देखील व्यक्त केले.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून श्रीकांत पाटील अध्यक्ष लोक शिक्षण संस्था वरोरा, प्रतिक जयंत पाटील चेअरमन राजारामबापू पाटील साखर कारखाना इस्लामपूर, वरोरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष एहेतेशाम अली, उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष मुकेश जिवतोडे, ॲड. बोढाले, गजानन जिवतोडे यासह आयोजकातील सर्व पदाधिकारी शिक्षक वृंद, खेळाडू व प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.