वरोरा/ प्रतिनिधी
आज मांडण्यात आलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा जन सामान्यांची फसवणूक करणारा आहे. आकड्यांचा खेळ मांडून अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांनी स्वतःची व सरकारची पाठ थोपटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. समोरील निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून मांडलेला हा अर्थसंकल्प असल्याचे दिसून येत आहे. या अर्थसंकल्पात युवक, शेतकरी यांच्या करीता कुठलेही स्थान नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे अर्थमंत्री ग्रामीण भागातील नागरीकांचे उत्पन्न वाढल्याचे सांगत आहे तर दुसरीकडे स्वतः च 80 करोड नागरीकांना अन्नधान्य पुरवत असल्याचे सांगत आहे. यावरुन केंद्र सरकारचा खोटारडेपणा जनतेसमोर येत आहे. भविष्यात आवास योजना अस्तित्वात आणू हे सांगून गरीब नागरिकांना गाजर दाखण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे आ.प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले.