अहेरी : तालुक्यातील किष्टापुर (दौड) येथे जय विर बाबुराव शेडमाके क्रीडा मंडळा कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.क्रिकेट सामन्याच्या उदघाटन पूर्वी गावात ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काडून राष्ट्रीय शहीद विर बाबुराव शेडमाके यांचा जन्मगाव असलेले किष्टापुर येथे त्यांच्या पूतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून ग्रामसेवक सुधीर मडावी तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच जयवंत मडावी,ग्राप सदस्या वनिता मडावी,माजी ग्राप सदस्य ईश्वर कोटा,आविस सल्लागार किशोर मडावी,सुधाकर मडावी,रमेश वेलादी,कारे मडावी,मदना येलाम,पेंटा तलांडी,अनिल मडावी,वंगाराम मडावी,रमेश मडावी,कारे वेलादी,बंडू तलांडी,इर्शाद शेख,आविस सल्लागार माधव कुडमेथे सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार दिपक आत्राम यांनी क्रिकेट खेळाविषयी व परिसरातील ज्वलंत समस्यांवर उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
टेनिस बॉल क्रिकेट सामन्यासाठी प्रथम पुरस्कार व द्वितीय पुरस्कार माजी आमदार दिपक आत्राम यांच्याकडून असे एकूण तीन बक्षीस ठेवण्यात आले.
जय विर बाबुराव शेडमाके क्रीडा मंडळा कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रमेश वेलादी यांनी मानले.या टेनिस बॉल सामन्याचे उदघाटनीय सोहळ्याला किष्टापुर,दोडगेर,पत्तीगाव सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सामन्याच्या यशस्वीतेसाठी चिना वेलादी,संतोष सिडाम,राहुल मडावी,अशोक सिडाम,संतोष मडावी,बापू मडावी,विनोद मडावी,मोहीम शेख,मोनू सय्यद,आसिफ सय्यद यांनी परिश्रम घेतले.