अयोध्या :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धामचे उद्घाटन केले. यासोबतच त्यांनी 15 हजार 700 कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणीही केली.
यावेळी आयोजित जाहीर सभेत त्यांनी विविध विकासकामांचा उल्लेख करत मोदी जेव्हा गॅरंटी देतात तेव्हा ती पूर्णच करतात असे म्हणत या गॅरंटीची अयोध्या देखील साक्षी असल्याचेही वक्तव्य त्यांनी केले. (PM Narendra Modi Ayodhya also witness to Modi guarantee Prime Ministers rant against the opposition)
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्या क्षणाबद्दल मीही तितकाच उत्साही असल्याचे पंतप्रधान म्हणाले. विमानतळाचा पहिला टप्पा 1450 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित करण्यात आला आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असेल, जे दरवर्षी सुमारे 10 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी सुसज्ज असेल. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्याधाम जंक्शनचेही उद्घाटन केले. त्यानंतर सहा वंदे भारत आणि दोन अमृत भारत ट्रेनलाही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. अयोध्या जंक्शनचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान वाल्मिकी विमानतळाकडे रवाना झाले. वाटेत ते उज्ज्वला आणि गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थी मीरा यांच्या घरी पोहोचले. तिथेच त्यांनी चहासुद्धा पिला. वाल्मिकी विमानतळाच्या उद्घाटनासोबतच्या उद्घाटनाबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एअर इंडिया एक्सप्रेसने 17 जानेवारीपासून अयोध्या ते बेंगळुरू आणि कोलकाता यांना जोडणारी थेट उड्डाणे सुरू होणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला एअरलाइनने अयोध्या ते दिल्ली दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती.
यावेळी आयोजित जाहीर सभेत त्यांनी विविध विकासकामांचा उल्लेख करत मोदी जेव्हा गॅरंटी देतात तेव्हा ती पूर्णच करतात असे म्हणत या गॅरंटीची अयोध्या देखील साक्षी असल्याचेही वक्तव्य त्यांनी केले
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्या क्षणाबद्दल मीही तितकाच उत्साही असल्याचे पंतप्रधान म्हणाले. विमानतळाचा पहिला टप्पा 1450 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित करण्यात आला आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असेल, जे दरवर्षी सुमारे 10 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी सुसज्ज असेल. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्याधाम जंक्शनचेही उद्घाटन केले. त्यानंतर सहा वंदे भारत आणि दोन अमृत भारत ट्रेनलाही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. अयोध्या जंक्शनचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान वाल्मिकी विमानतळाकडे रवाना झाले. वाटेत ते उज्ज्वला आणि गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थी मीरा यांच्या घरी पोहोचले. तिथेच त्यांनी चहासुद्धा पिला. वाल्मिकी विमानतळाच्या उद्घाटनासोबतच्या उद्घाटनाबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एअर इंडिया एक्सप्रेसने 17 जानेवारीपासून अयोध्या ते बेंगळुरू आणि कोलकाता यांना जोडणारी थेट उड्डाणे सुरू होणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला एअरलाइनने अयोध्या ते दिल्ली दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती.
वंदे भारतला तरुणांची पसंती
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अयोध्येतील नवीन टाऊनशिपमुळे जीवन सुसह्य होईल. वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर मोदी म्हणाले की, सेवेच्या भावनेने अमृत ट्रेन सुरू करण्यात आली आहे. वंदे भारत ट्रेन विश्वासाची नवीन केंद्रे जोडत आहे. अयोध्येतून पहिली अमृत भारत ट्रेन सुरू झाली आहे. तरुण पिढी वंदे भारत ट्रेनला पसंती देत आहे. इतरांच्या सेवेपेक्षा कोणताही धर्म मोठा नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सरयूतील दूषित पाणी थांबविणार
विकास कामांबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अयोध्येत रस्त्यांचे रुंदीकरण केले जात आहे. अयोध्येत अनेक रस्त्यांचे उद्घाटनही झाले आहे. एकेकाळी रामलल्ला मंडपात बसत होते, आता राम मंदिरात बसणार आहेत. सामायिक शक्ती देशाला आघाडीवर घेऊन जाईल. सरयूमधील प्रदूषित पाणी थांबविण्याचे काम करण्यात आले आहे.
देशाचा मोदींवर विश्वास
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजकाल काही लोक मला विचारतात की, मोदींची गॅरंटी काय आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, लोकांचा हा विश्वास मिळवण्यासाठी मोंदींनी आयुष्य खर्ची घालवले. आज देशाला मोदींवर विश्वास आहे, कारण मोदी जे हमी (गॅरंटी) देतात ते पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम करतात. अयोध्या नगरीही याची साक्षीदार आहे. आणि आज मी अयोध्येतील जनतेला पुन्हा विश्वास देतोय की, अयोध्येचा सर्वोतोपरी विकासच करून दाखवेन असेही आश्वासन त्यांनी यावेळी अयोध्या वासियांना दिले.