मूल : जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या नगर परिषद मूलचे माजी नगरसेवक विनोद कामडे यांना दोन वर्षांपूर्वी डोक्याच्या आजाराने ग्रासले होते . हलाखीच्या परिस्थितीमुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे नव्हते याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून माहीत होताच मदतीचा ओघ सुरू झाला. आणि अवघ्या काही दिवसांत लाखो रुपये जमा झाले होते. त्या नंतर त्यांचा उपचार सुरु झाला होता.दोन वर्षापासून विनोद जीवनाशी संघर्ष करत असतांना अखेर आज त्याचा प्रयत्न थांबला आणि त्याने स्वास सोडला.
ते म्हणतात ना जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला या उक्ती प्रमाणे असेच काहीसे आज घडले राजकीय क्षेत्रात पुढाकार घेऊन सातत्याने सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारा, जनसामान्यांसाठी नेहमीच कार्यतत्पर अशी ओळख असलेल्या विनोद कामडे.याचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारला उमानदीवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.