चंद्रपूर :- 27 नोव्हेंबर 2023 रोजी मौजा नावरगाव (रत्नापूर) ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर येथे आदिवासी समाज मंडळ नवरगावच्या वतीने क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात आपल्या उदघाटकीय भाषणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमुर लोकसभा सामान्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी बिरसा मुंडा यांनी केलेल्या संघर्षा बद्धल माहिती देऊन बिरसा मुंडा यांनी इंग्रजांचे हस्तक जमीनदार, मालगुजर व साहूकार यांनी त्यावेळी चालविलेल्या अत्याचारा विरुद्ध बंड पुकारले.
बळजबरीने शेतसरा वसूल करने, आदिवासी शेतकऱ्यांना फुकट राबविणे , त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेल्या जमिनी बळकावून त्यांना जंगलात पळवून लावणे इ. अत्याचार करीत होते. आपल्या जमिनीचे व अस्तिवाचे स्वरक्षण करण्यासाठी बिरसा मुंडा यांनी लोकांना संघटित करुन संघर्ष केला व अवघ्या वयाच्या 25 व्या वर्षी जीवाचे बलिदान दिले. आजच्या परिस्थितीत होणाऱ्या अन्याया विरुद्ध सुद्धा आपण संघटित होऊन संघर्ष करायला पाहिजे. आपल्याला मिळणारे अधिकार कोणी हिरावून घेत असेल तर जागरूक राहून संघटित रूपाने त्याचा प्रतिकार करायला पाहिजे. असे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी विकास परिषदेचे केंदिय सदस्य जनार्दनजी पंधरे, माजी जि. प. सदस्य खोजरामजी मारस्कोल्हे, डॉ. श्रीकांत मसराम, अ. भा. आ. वि. प. जिल्हाध्यक्ष जनार्दन गेडाम, सरपंच राहुल बोडणे,
अ. भा. आ. वि. प. प्रदेश महासचिव केशव तिराणिक, प्रा. परशुराम उईके, अ. भा. आ. वि. प. महिला जिल्हाध्यक्ष गीता सलामे, बाबुराव जुमनाके, पुष्पा सिडाम, संजय गहाणे, राहुल बोडणे, गीता सलामे, पंकज उईके, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने आदिवासी बंधू भगिनी उपस्थित होते.