वरोरा :- सध्या तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे .आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या उप जिल्हा रुग्णालयात वाढत चालली असून वैधकिय अधीक्षक यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे रुग्णाचे हाल होत आहे . ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस चे वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख जयंत टेमुर्डे यांच्या लक्षात येताच त्यांनी . वैधकीय अधीक्षक डॉ. खुजे यांची भेट घेत. रूग्णालयातील समस्याचे निराकरण करण्या संदर्भात निवेदन दिले .
तसेच वैधकिय अधीक्षक डॉ. खुजे यांच्याशी नियोजन ,आरोग्य साहित्य , औषध , व परिसर स्वच्छता या विषयावर चर्चा करून ग्रामीण व शहरी जनतेला आपल्या विभागामार्फत सेवा देण्याची विनंती करण्यात आली.तसेच वरोरा येथे ट्रॉमा केअर दवाखाना सुरू आहे पण त्या ठिकाणी डॉक्टरची कमतरता असल्याने पाहिजे ती सुविधा आपण जनतेला देऊ शकत नाही या साठी स्टॉप चे नियोजन करावे असे सांगण्यात आले .या वेळी अविनाश ढेगळे, अरुण साहरे, राजू वरघाने,विजय धदरे,प्रवीण वासेकर,सुनीता राऊत,लता हिवरकर, सुशीला तेलमोरे,मोनाली काकडे, शिल्पा रूयारकर,मारोती किंनाके, नागाजी निंभरकर,मुकेश वाटकर व असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी उपस्थीत होते.