गडचिरोली: एका ६५ वर्षीय इसमावर आपल्या राहत्या घरी रान डुकाराने हल्ला करून ठार केल्याची घटना १४ सप्टेंबर (गुरुवार) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.विस्तारी शिवय्या जक्कुलवार वय अंदाजे (६५) वर्ष असून सदर इसम अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू येथील रहिवासी आहे.
प्राप्त माहितीनुसार विस्तारी शिवय्या जक्कुलवार आणि त्यांची पत्नी हे दोघे मोलमजुरी करून बोटलाचेरू येथे आपल्या स्वतःच्या घरी राहत होते. घरालगत सांधवाडीत त्यांनी मका लागवड केली होती. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या सांधवाडीत काही प्राणी शिरल्याचे भास होतच त्यांनी गाय,बकरी सारखे पाळीव प्राणी वैगरे असणार म्हणून हाकलायला गेले असता अचानक रान डुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला.त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.डुकराचा हल्ला इतकं भीषण होतं की त्या वयोवृध्द इसमाचा शरीरावर अनेक ठिकाणी अक्षरशः जखमा झाल्या.मोठ्या प्रमाणात रक्त स्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी धाव घेऊन वन विभागाला माहिती दिली.उपविभागीय वन अधिकारी रविकांत ढेंगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी आरती मडावी यांनी बोटलाचेरू येथे भेट देऊन मोका पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय अहेरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.जंगली डुक्कराच्या हल्ल्यात ऐन पोळ्याच्या दिवशी वयोवृद्ध इसमाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केले जात आहे.
सदर व्यक्तीला तीन मुलं असून तिघेही आपापल्या परिवारासोबत अलग मात्र त्याच गावात वास्तव्याने राहतात.हल्ला झाल्याच्या ठिकाणी वयोवृद्ध विस्तारी जक्कुलवार आणि त्याची पत्नी राहायचे.घरालगत शेती आणि काही अंतरावर तलाव आहे.या भागात जंगली प्राण्यांचा मुक्त संचार असून घरालगत सांधवाडीत ही घटना घडल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अहेरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह १५ सप्टेंबर (शुकरवरी) बोटलाचेरू येथे पाठविले आहे.तर शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच वन विभागाकडून अर्थसाहाय्य मदत केली जाणार असल्याची माहिती येथील वन परिक्षेत्र अधिकारी आरती मडावी यांनी सांगितले.