गडचिरोली:-दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते एटापल्ली रस्त्यावरील मद्दीगुडम येथे १५ सप्टेंबर (शुक्रवार) ला दुपारच्या सुमारास घडली.यात किशोर निलीवार (५२) रा. एटापल्ली जिल्हा गडचिरोली यांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर या अपघातात चैतु आरे मडावी (३५),बंडू कारे मडावी (३५) दोघेही राहणार पंदेवाही ता.एटापल्ली हे गंभीर असून त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार एटापल्ली येथील किशोर निलीवार हे काही कामानिमित्त आपल्या दुचाकीने एटापल्ली वरून आलापल्ली कडे येत होते.तर दुसऱ्या दुचाकीवर चैतु आरे मडावी आणि बंडू कारे मडावी हे दोघेजण आलपल्ली वरून एटापल्ली तालुक्यातील पंदेवाहीकडे जात होते.मद्दीगुडम गावाजवळ दोन दुचाकींचा समोरासमोर धडक झाल्याने त्यात किशोर निलीवार यांचा जागीच मृत्यू झाला तर या दोघांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेने अहेरी येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे.त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
अपघात इतकं भीषण होतं की दुचाकीचा समोरचा चाक अक्षरशः अलग होऊन दुचाकी चेंदामेंदा झाला आहे.ऐन तान्हा पोळ्याच्या दिवशी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.किशोर निलीवार हे पद्माशाली समाजाचे एटापल्ली तालुका अध्यक्ष असून ते टेलरिंग काम करायचे.त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुलं आहेत.सध्या अहेरी येथे शवविच्छेदन सुरू आहे.