आलापल्ली :- आलापल्ली येथील स्थित भगवान श्रीकृष्ण मंदिरात माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अंब्रिशराव आत्राम यांनी जाऊन श्रद्धा भावनेने पुष्पहार घालून दर्शन घेतले.
यावेळी मंदिराचे विश्वस्त यांनी राजेंचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
कृष्ण जन्माष्टमी ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात, हा वार्षिक हिंदू सण आहे. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.
गोकुळाष्टमी हा सण भारतामध्ये खूप आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या जन्मदिवशी दहीहंडी सारखे कार्यक्रम साजरे केले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला वेगवेगळ्या नावांनी बोलावले जाते. जसे की गोविंद, बाल गोपाल, कान्हा, गोपाल केशव हि सर्व श्रीकृष्णांची प्रसिद्ध नावे आहेत. गोकुळाष्टमी ही भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापासून हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवसापासून, हिंदू द्वारा प्रत्येक वर्षी साजरी केली जाते.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सृष्टीचे पालनकर्ता म्हणणारे श्रीहरी विष्णूचे अठरावे अवतार प्रभु श्रीकृष्ण आहे आणि कृष्णाच्या जन्मदिवशी गोकुळाष्टमी साजरी केली जाते. श्रीकृष्णाबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी आपल्या भुतलावर म्हणजे पृथ्वीवर एक साधारण माणसाचा जन्म घेतला आणि श्रीकृष्णाचा जन्म हा धर्माचे रक्षण करण्यासाठी झाला होता.
त्यामुळे भारतामध्ये हजारो वर्षांपासून गोकुळाष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गोकुळाष्टमी भारतामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णाचे पूजन करून केले जाते. काही ठिकाणी भक्ती संगीत गायली जाते. तर काही ठिकाणी कृष्णाच्या मूर्तीला दही दुधाचा अभिषेक घातला जातो.