मुलचेरा: खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास सहजपणे होऊ शकतो शारीरिक व मानसिक दृष्ट्या खेळाडू खेळातून कणखर बनतो, असे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी केले.
मुलचेरा तालुक्यातील देवनगर येथे आयोजित भव्य फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विवेकानंदपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा भाजपचे कार्यकर्ते तपन मलिक, सुंदर नगर ग्रामपंचायतचे सदस्य बबलू शील, विजय विश्वास, संजीव सरकार,शुभम कुत्तरमारे आदी भाजपचे कार्यकर्ते तसेच फुटबॉल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना खेळाच्या माध्यमातून व्यक्ती हा सुदृढ बनत असतो व व्यक्तिमत्व विकासाचा पहिला प्रभाव म्हणजे त्याची शरीरयष्टी, त्याची दिसणे, त्याचे वागणे, चालणे बोलणे या बाबी खेळांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकसित होत असतात. मानसिक विकासामध्ये खेळाडू हा खेळाच्या माध्यमातून सक्षम बनत असतो. त्याच्यामध्ये संयम वाढतो, व्यक्तिमत्व विकासात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नेतृत्व गुण, एकात्मता व बंधुभाव वाढतो. खेळाच्या माध्यमातून संघभावना वाढते, एकमेकांविषयी आदर निर्माण होतो. व्यक्तिमत्त्वाचा विकास करायचा असेल तर खेळ हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे तरुणांनी विविध खेळ खेळले पाहिजे असे त्यांनी यावेळी आवाहन केले.
मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या भव्य फुटबॉल स्पर्धेचे पारितोषिक माजी राज्यमंत्री तथा भाजपचे नेते राजे अम्ब्रीशराव आत्राम आमच्याकडून देण्यात आले होते. या स्पर्धेसाठी विविध भागातून फुटबॉल संघांनी सहभाग नोंदविला.अखेरच्या सामन्यानंतर माजी जि प अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.