गडचिरोली:जिल्ह्यात दक्षिण भागातील सर्वात मोठी नगरपंचायत म्हणून ओळख असलेल्या अहेरी येथे भर पावसाळ्यात भीषण पाणीटंचाई असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.या विषयावर बातम्या प्रकाशित होताच अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी या बाबीची गंभीर दखल घेतली असून पाणी समस्यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागांची आढावा सभा बोलावली आहे.
अहेरी नगरपंचायत अंतर्गत एकूण १७ प्रभाग असून यातील प्रभाग क्रमांक १६ आणि १७ प्रभागातील गड अहेरी,गड बामणी आणि चेरपल्ली या तीन गावांत भर पावसाळ्यात टँकर ने पाणी पुरवठा केली जात आहे.विशेष म्हणजे या भागात सायंकाळच्या सुमारास एकदाच पाणी पुरवठा केली जात असून केवळ तीन गुंड पाण्यासाठी नागरिकांना मोठी तारांबळ कसरत करावी लागत आहे.स्वतःचा जीव धोक्यात टाकून भर रस्त्यावर पाणी घेण्याची नामुष्की येथील नागरिकांवर ओढवली आहे.
पाणी संकटाचे कायंसवरूपी तोडगा काढण्यासाठी येथील नागरिकांनी अनेकदा विविध कार्यालय आणि लोकप्रतिनिधींची भेट घेऊन निवेदन दिल्यावरही हा प्रश्न मार्गी न लागल्याने आहे त्या परिस्थितीत जीवन जगावे लागत आहे.याबाबत काही वृत्तपत्र आणि वेब पोर्टल तसेच युट्युब चॅनल नी बातम्या प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर नुकतेच रुजू झालेले अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी अहेरी नगरपंचायत अंतर्गत समाविष्ट काही गावात प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पाण्याची भीषण टंचाई असल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ या गंभीर बाबीची दखल घेऊन येथील नगर पंचायतचे मुख्याधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप अभियंता व पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांना पिण्याचे पाण्याची टंचाई बाबत उपाययोजना करण्याकरिता ०८ सप्टेंबर २०२३ रोजी आवश्यक माहितीसह आढावा सभेला उपस्थित राहण्यासाठी पत्रच धाडले आहे. त्यामुळे आता शासन स्तरावर याची दखल होऊन अहेरी नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १६ आणि १७ मध्ये पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागेल अशी आशा निर्माण झाली आहे.