भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने योगी अरविंद सभागृहात शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. उत्तम घोसरे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्योती राखुंडे उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांनी उपस्थितांना शिक्षक दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रमेश पारेलवार, संचालन प्रा.अमोल ठाकरे आभारप्रदर्शन डॉ. गजानन खामनकर यांनी केले. यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक तथा विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.