वरोरा :- खाजगी कंपनीत काम करायला लागणारे ऑपरेटरला हेवी मशिन चालविण्याचे प्रशिक्षण वेकोलिच्या प्रत्येक एरियात देवून मनुष्यबळाची निर्मिती करून खाजगी कंपनीला पुरविण्यात यावी अशी डॉ. अंकुश आगलावे यांनी अध्यक्ष तथा प्रबंधन निदेशक यांना पत्र देवून केली आहे.
यावेळी डॉ. आगलावे यांनी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर व महाराष्ट्र राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री सुधिरभाऊ मुनंगटीवार यांना निवेदन देवून मागणी केलेली आहे.
वेकोलिमध्ये प्रत्येक एरियात अनेक खाजगी कंपनीचे काम सुरू असून त्यात पेटी कॉन्ट्रकमध्ये काम करणारे प्रोक्लॉन, एचव्हीएम व व्होल्वो ऑपरेटर, यांना प्रशिक्षण देण्याकरीता खाजगी कंपनीच्या माध्यमातून बेंगलोर येथे पाठविण्यात येते. तसेच परप्रंातातुन ऑपरेटर मागविण्यात येते. त्या ऑपरेटरची गुन्हेगारी पार्श्वभुमी आहे किंवा नाही अशी तपासणी केली जात नाही. यामुळे वेकोलिच्या बहुतांश एरियामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे यावर आळा बसू शकते असे डॉ. आगलावे यांनी पत्रात सांगितले.
स्थानिक भुमीहीन, बेरोजगार व शेतकरी युवकांना जर प्रोक्लॉन, एमव्हीएम व व्होल्वो ऑपरेटर, अशा हेवी मशिन चालवण्यिाचे प्रशिक्षण दिल्यास स्थानिकस्तरावर मोठया प्रमाणात कुशल हेवी मशिन ऑपरेटर उपलब्ध होतील व त्यांना खाजगी कंपनी रोजगार प्राप्त होण्याची संधी उपलब्ध होतील असल्याचे डॉ. आगलावे यांनी सांगितले.