वरोरा :- तालुक्यातील सोईट येथील नदीपात्रात युवकाचा मृतदेह असल्याचे २७ ऑगस्ट रोज रविवारला ला दुपारी ३.३० ला उघडकीस आले.गावातील तंटामुक्त समिती अध्यक्षांनी सदर घटनेबाबत पोलिसांना सूचना दिली.माढेली पोलीस चौकी बिट अमलदार ईश्वर गायकवाड यांनी आपल्या पोलीस सहकाऱ्यांसोबत घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि शव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
सोईट नदीपात्राचे काठावर पाण्यामध्ये मृतदेह असल्याचे २७ ऑगस्टला गावातील काही युवकांना दिसून आले.आणि लगेच सदर युवकांनी घटनेची माहिती प्रथमतः गावातील तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप पुसदेकर यांना दिली.त्यांनी पोलिसांना घटनेची सूचना दिली.आणि लगेच माढेळी पोलीस चौकीचे बिट अमलदार ईश्वर गायकवाड यांनी आपल्या पोलीस चमुसह घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला.आणि शव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आले.मृतक युवकाची ओळख पटली असून हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर येथील सूरज अनंतराव लांभाडे वय 25 वर्ष ,अशी ओळख पटली आहे.मृतक हा वर्धा जिल्ह्यातील असून मृतकाचे नातेवाईक सोईट येथे राहतात. परंतु हल्ली ते चंद्रपूरला असतात. त्याचा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात नदीपात्रात मिळणे यामध्ये आत्महत्या की घातपात? असा प्रश्न उपस्थित होत आहे.मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही.घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.