मूलचेरा: हाती घेतलेल्या कार्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि निरंतर प्रयत्न तसेच नेहमीच मदतीचा हात समोर करणारे म्हणून या आपल्या कार्यशैलीमुळे लोकप्रिय ठरलेल्या माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम आपल्या मतदारसंघातील गरीब व गरजू रुग्णांना नेहमी आर्थिक मदत मिळवून देत असतात.त्यांनी पुन्हा एका गरीब रुग्णाला पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे.
मुलचेरा तालुक्यातील स्थानिक विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवनगर येथील रहवासी असलेले दिलीप बिश्वास हे काही दिवसापासून आजाराने ग्रस्त असून स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.मात्र त्यांच्या प्रकृती मध्ये काही सुधारणा होत नसल्याने त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी जायचे होते. पण आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर गाठणे शक्य नव्हते.याची माहिती मिळताच अम्ब्रिशराव आत्राम यांनी येथील रुग्णालय गाठून क्षणाचाही विलंब न करता दिलीप बिश्वास यांच्या कुटूंबाची भेट घेतली,आस्थेने त्यांची विचारपूस करत आर्थिक मदत केली.यापुढेही मदत लागल्यास थेट संपर्क करण्यास सांगितले.
यावेळी विवेकानंदपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच तपन मल्लिक, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गणपती,जिल्हा सचिव बादल शाह,युवा मोर्चा अध्यक्ष संजीव सरकार, नगरसेवक दिलीप आत्राम,किशोर मल्लिक, गणेश गारघाटे, अक्षय चुधरी, गुलशन मलेमपल्ली, पवन आत्राम हे उपस्थित होते.