सिरोंचा:-राज्याच्या शेवटच्या टोकावर व छत्तीसगड सीमेवरील असलेल्या उपपोस्टे पातागुडम अंतर्गत समाविष्ट अतिसंवेदनशील पेंडलया गावाला पोलिसांनी भेट देऊन येथील नागरिकांना विविध जीवनावश्यक वस्तू वितरण केले.
पातागुडम हे गाव राज्याच्या शेवटचा टोकावर असून छत्तीसगड सीमेवर वसलेला आहे.या उप पोलीस स्टेशन अंतर्गत असलेली बरीच गावे आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त असल्याने पोलिसांना पेट्रोलिंग करावे लागते.असेच पेट्रोलिंग दरम्यान पातागुडम ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट पेंडलया या अतिसंवेदनशील गावात भेट दिली असता पोलीस उप निरीक्षक अभिजित तुतुरवाड यांना गावात अनेक समस्या आढळून आले.लगेच त्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधून विविध समस्या जाणून घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या पोलीस दादालोरा खिडकी या अभिनव उपक्रमाची माहिती दिली.एवढेच नव्हेतर त्यांनी नागरिकांची हलाखीची परिस्थिती बघून विविध जीवनावश्यक वस्तू वाटप केले. त्यात महिलांना साडी,पुरुषांना लुंगी तर लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वितरण केले.
उपपोस्टे पातागुडम येथील पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतूरवाड तसेच जिल्हा पोलीस अंमलदार यांनी नक्सलविरोधी अभियान राबविताना यापूर्वीच त्यांना या गावाची परिस्थितीची माहिती मिळाली होती.दुसऱ्यांदा गावात जाताना त्यांनी गावातील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू वितरण करण्याचे ठरविले होते आणि ते स्वतः पोलीस जवनांसोबत ग्राम भेट देऊन नागरिकांशी आस्थेने संवाद साधत विविध जीवनावश्यक वस्तू वितरण केले.
पेंडलया हे गाव पातागुडम ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट असून जवळपास 350 ते 400 लोकांची वस्ती आहे. ग्रामभेटी दरम्यान गावात 70 ते 80 लोक उपस्थित होते. शेतीचे कामे सुरू असल्याने बरेचजण शेतीच्या कामात व्यस्त होते. उपस्थितांनी गावात शासकीय योजना पोहोचत नसल्याचे सांगताच परिसरातील नागरिकांना कुठलीही मदत लागल्यास किंव्हा विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी थेट उप पोलीस स्टेशन ला संपर्क करा आणि पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध योजनाबद्दल माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पोलीस उप निरीक्षक अभिजित तुतुरवाड तसेच पोलीस जवान उपस्थित होते.