अहेरी : माजी जि प अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याहस्ते जल शुध्दीकरण केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले असून आता ग्रामपंचायत कार्यालय नागेपल्ली अंतर्गत येत असलेल्या पुसुकपल्ली वासियांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे.
येथील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी १५ व्या वित्त आयोगाची निधी देऊन जलशुद्धिकरण केंद्र मंजूर करण्यात केली होती.सदर जल शुध्दीकरण बांधकामाचे भूमिपूजन दि.18 सप्टेंबर 2022 रोजी करण्यात आले होते.नुकतेच जलशुद्धिकरण केंद्राचे काम पूर्णत्वास आल्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.तसेच पुसुकपल्ली गावातील नागरिकांना वॉटर ATM वाटप करण्यात आले.
यावेळी नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडपे,उपसरपंच रमेश शानगोंडावार,सदस्य मंजुषा गावडे,शेवंता भोयर,राकेश कुळमथे बाजार समिती सचालक तथा ग्रामपंचायत सदस्य नगेपल्ली,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,रवींद्र भोयर,अविका सोसायटी अध्यक्ष,शामराव कुळमेथे,शाळा समिती अध्यक्ष रामदास चौधरी,पेस समिती अध्यक्ष रमेश डोके,बाबुराव चौधरी,अशोक चौधरी,परदेशी डोके,रमलू चौधरी,प्रभाकर चौधरी,नागुलु येल्लुर,संतोष केरकर,संतोष येलुर,शकर कटेल,सत्यवान जावदे,किशोर जवादे,वेंकठी कल्याडम,रमेश भोयर,मोहनेश भोयर,सुधाकर जनकपुरे,दिवाकर जनकपुरे,बापू आत्कुवार,शंकर आत्कुरवार,विनोद मधुकर,भोयर बाबुराव तोराम्म, विनोद रामटेके,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते तसेच नागरी उपस्थित होते