गडचिरोली: भारनियमनामुळे भेंडाळा परिसरातील शेतकरी संकटात सापडले असून भार नियमन बंद करून 24 तास वीज पुरवठा सुरू करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्याकडे निवेदन दिले आहे.
भेंडाळा सबस्टेशन अंतर्गत एकूण बारा गावात गेल्या जानेवारी महिन्यापासून भारनियमन सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी बांधवांना विविध पिकासाठी पाण्याअभावी विविध संकटाना सामोरे जावे लागत आहे.या भागातील छोटे लघुउद्योग बंद पडण्याच्या स्थितीत आहे.अगोदरच पावसाने दांडी मारली आणि त्यात भार नियमन त्यामुळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे.
सुरू असलेले भार नियमन बंद करून भेंडाळा सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या बारा गावातील शेतकरी बांधवांची समस्या सोडविण्यासाठी आज या परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन समस्या सांगत निवेदन सादर केले आहे. यावेळी भाजपा अनुसुचित जाती आघाडी प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री आशीष पिपरे,भाग्यवान पीपरे, संजय खेडेकर कानुजी बोरीकर,बाबुराव बारसागडे, काशिनाथ कोहळे, भैय्याजी पीपरे,अरुण वासेकर, आनंदराव वासेकार, बंडू बारसगडे,श्रीरंग बारसगडे, श्रीरंग वैरागडे,विलास पिपरे शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्वरित समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.