गडचिरोली:जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी रविवार (१३ ऑगस्ट) रोजी अहेरी तालुक्यातील नागेपल्ली गावात चक्क पदयात्रा काढत विकास कामांचे भूमिपूजन केले.
नागेपल्ली येथील सेंट फ्रॉन्सिस कॉन्व्हेट समोरील रस्त्यावर खड्ड्यांचा साम्राज्य निर्माण झाल्याने येथील नागरिकांसोबतच कॉन्व्हेंट ला ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.येथे सिमेंट रस्त्याचे बांधकाम झाले पाहिजे म्हणून येथील सदस्य तथा मंत्री धर्मराव बाबांचे खंदे समर्थक मल्लारेड्डी येमनूरवार यांनी ही मागणी रेटून धरली होती.अखेर न विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची अडचण लक्षात घेऊन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी ६० लाख रुपयांची निधी मंजूर करून दिली.
नुकतेच मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी शनिवार (१२ ऑगस्ट) रोजी सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा येथील उप पोलीस स्टेशन च्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करून ते आपल्या अहेरी येथील निवासस्थानी मुक्कामी होते.मल्लारेड्डी येमनूरवार यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना रस्ता बांधकामाच्या भूमिपूजनासाठी विनंती केले.
दिवसभर व्यस्त कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू असतानाच त्यांनी शालेय विद्यार्थी आणि नागरिकांची अडचण लक्षात घेऊन भूमिपूजन करण्यासाठी नागेपल्ली गाठले. एवढेच नव्हे तर अहेरी ते आलापल्ली दरम्यान असलेल्या नागेपल्ली प्रवेशद्वारापासून चक्क कालीमाता मंदिर पर्यंत त्यांनी पदयात्रा काढत विकास कामांचे भूमिपूजन केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे नागपूर विभागीय अध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हाध्यक्ष शाईन हकीम,सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कैलास कोरेत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष स्वप्निल श्रीरामवार,नागेपल्ली चे सरपंच लक्ष्मण कोडापे,उपसरपंच रमेश शानगोंडावार, सदस्य मल्लारेड्डी येमनूरवार,राहुल सीडाम,फिलिक्स गिब, ज्योती ठाकरे,लक्ष्मी सीदडाम,प्रतिष्ठित नागरिक तथा माजी प स सदस्य कांचनलाल वासनिक,माजी ग्रा प सदस्य प्रकाश चुनारकर,मोहन खोब्रागडे,गणेश दुर्गे,संदीप येमनूरवार,किशोर धक्काते,जीवन बिश्वास,किरण खोब्रागडे,सारंग सौरंगपती,किशोर दुर्गे,बंडू भांडेकर,सत्तू मेडपल्लीवार,अशोक रापेल्लीवार,अमोल रापेल्लीवार,गणपत चौधरी,नानय्या कोटरांगे,ईश्वर गुरनुले,मोनू निकोडे,भास्कर गुडपवार,रेखाताई सिंग,शोभाताई लढी,सविता गुरनुले,गीता निकोडे,प्रशांत रागीवार आदी उपस्थित होते.