गडचिरोली:-अल्प कालावधीतच लोकप्रिय झालेले सह्याद्रीचा राखणदार मराठी साप्ताहिक जिल्हा कार्यालयाचे नागेपल्ली येथे रविवार (१३ ऑगस्ट) रोजी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते भव्य उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे.
सदर उदघाटन सोहळा माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष शाहीन भाभी हकीम,राष्ट्रवादी काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.तर,विशेष अतिथी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभवजी वाघमारे,एटापल्ली तथा अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य संपादक मारोती नारायण घुमे,सामाजिक कार्यकर्ते बबलू भैय्या हकीम,लायड्स मेटल्स कंपनीचे व्यवस्थापक साई कुमार, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर व्ही बी बोम्मावार,सामाजिक कार्यकर्ते बलराम सोमनानी,सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ मुक्कावार,रोमित तोम्बर्लावार,डॉ चारणजीत सिंह सलूजा,ग्रामपंचायत सदस्य मल्लरेड्डी येमनूरवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मुख्य संपादक मारोती नारायण घुमे यांनी २०१८ मध्ये पोर्टल च्या माध्यमातून याची सुरुवात केली होती. सह्याद्री ने आज युट्युब, साप्ताहिक आणि लाईव्ह प्रक्षेपण पर्यंत मजल मारली असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात काम सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात नागेपल्ली येथे आज सह्याद्रीचा राखणदार या मराठी साप्ताहिक कार्यालयाचा उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे.लवकरच संपूर्ण जिल्ह्यात याचे विस्तार करण्याचा संकल्प आहे.
विशेष म्हणजे या उदघाटन सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण होणार असल्याची माहिती जिल्हा प्रतिनिधी आनंद दहागावकर यांनी दिली आहे.