गोंडपिपरी:- आज दि.१२(रविवारी) ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीतीत राजुरा येथील कार्यक्रमात कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक राकेश पुन यांनी भाजपात प्रवेश करत घरवापसी केल्याने तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
भाजपा राजुरा विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी माजी जी प अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याकडे आली.त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राजुऱ्यात आज थाटामाटात शक्तिप्रदर्शन करीत देवराव भोंगळे यांनी केले.यावेळी ना.सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.या दरम्यान आयोजित सभेत काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक राकेश पुन यांनी शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केल्याने भाजपच्या गटात नवचैत्यन निर्माण झाले असून काँग्रेस मध्ये मोठी खिंडार पडली आहे.राकेश पुन यांच्या मागे तालुक्यातील मोठा युवा वर्ग सोबत असल्याने भाजपला येणाऱ्या जी प,पं समिती निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होईल असे मत सहयाद्री राखणदार च्या प्रतिनिधीशी बोलताना तालुका अध्यक्ष बबन निकोडे यांनी व्यक्त केला.