चिमूर :- तालुक्यातील पुयारदंड येथे मागील आठवड्यामध्ये जुन्या भांडणातून घराशेजारी एकटीच महिला राहत असताना तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने गैरहर्जदाराने स्वतःचे मकानातील विद्युत बोर्ड मध्ये वायर टाकून पीडित महिले च्या मकानाचे बाजूने असलेल्या तारांच्या कुंपणाला वीज प्रवाहित करून दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेरगावी निघून गेला. सदर कुंपणाच्या वीज प्रवाहित तारांना एका कुत्र्याला तारांचा स्पर्श होताच तो घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती पीडित महिलेच्या लक्षात आली. विद्युत कार्यालय भिसी येते स्वतः सूचना केल्यानंतर एका लाईन मेन च्या सहाय्याने घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन विद्युत खंडित करण्यात आली. पोलीस कर्मचारी, सरपंच , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व असंख्य नागरिकांचे समक्ष पशुवैद्यकीय अधिकारी यांचे हस्ते सदर मृत कुत्र्याचे शव विच्छेदन अहवाल तयार न करताच विल्हेवाट लावली . वीज वितरण कंपनीच्या भिसी येथील अभियंत्याने जाणीवपूर्वक अहवाल तयार न केल्यामुळे विजेचा प़वाह सुरू करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा शेजारी गैरअर्जदार आजही पोलीस कारवाई पासून बचावला आहे . यामुळे गैरअर्जदारास विद्युत अभियंत्यांचे पाठबळ असल्याचा आरोप सोमवारला भिसी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून लिलाबाई बोरकर या महिलेने केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून गैरअर्जदार अंबादास बोरकर व गैरअर्जदारास पाठबळ देणाऱ्या अभियंत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.
प्राप्त माहितीनुसार दिनांक २६ जुलैला सकाळी पीडित महिलेला तारांच्या कुंपणाला विजेचा शाक लागून कुत्रा मृत अवस्थेत दिसल्यानंतर गावातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षांच्या सूचनेनुसार पोलीस स्टेशन भिसी व त्यानंतर वीज वितरण कंपनी शाखा भिसी येथे सूचना दिल्यानंतर अभियंत्यांच्या सूचनेनुसार मंगेश माथनकर या लाईन मन ने असंख्य नागरिकांच्या उपस्थितीमध्ये चौकशी करून गैरअर्जदार अंबादास बोरकर यांनी स्वतःचे निवास स्थानी असलेल्या विद्युत मीटर मध्ये वायर टाकून वीज प्रवाहित करून लिलाबाई बोरकर या महिलेच्या घराचे दिशेला असलेल्या ताराच्या कुंपनाला वीज प्रवाहित केल्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झालेला आहे असे उपस्थितांना सांगितले. तेव्हा या संबंधी सदर अभियंत्याने अहवाल तयार करून पोलीस विभागाकडे पाठविणे गरजेचे होते. परंतु त्यांनी आपल्या कामांमध्ये हयगय करून गैर अर्जदारास अप्रत्यक्षपणे पाठबळ दिलेले आहे. गैरअर्जदाराने जुन्या घरगुती भांडणातून सदर पीडित महिलेला जिवे मारण्याचे उद्देशाने वीज प्रवाह सुरू करून दुसऱ्या सकाळी बाहेर गावला निघून गेला होता . गैरअर्जदाराच्या कृत्यामुळे पाळीव प्राणी कुत्र्यांचा जीव गेला. अन्यथा या ठिकाणी परिसरात असंख्य बालके खेळत असतात तेव्हा खेळणारे बालके किंवा पीडित महिलेचा जीव गेला असता. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गैरअर्जदराला पाठबळ देणाऱ्या अभियंता व गैरअर्जदारांवर सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेतून लिलाबाई बोरकर या महिलेने केलेली आहे. पत्रकार परिषदेला पीडित महिला लिलाबाई बोरकर व तिचा भाऊ मुरलीधर बोरकर उपस्थित होते. यासंबंधी वीज वितरण कंपनी शाखा भिसीचे अभियंता कृपाल लांजे यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
तसेच पोलीस स्टेशन भिसी चे सहाय्यक ठाणेदार संजय जंगम यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेतली असता वीज वितरण कंपनीकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली.