आलापल्ली:दरवर्षी प्रमाणे यंदाही जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आलापल्ली येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी विविध मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करतांना मान्यवरांनी आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे असे आवाहन केले.एवढेच नव्हेतर पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या रुढी, प्रथा, परंपरा, बोलीभाषा जतन करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा तसेच आपल्या समाजावर होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात महापुरुषांचा विचारातून संविधानिक मार्गाने हक्क, अधिकारासाठी संघर्ष करावे असे आवाहन करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमात गोंडमोहल्ला ,पटेल मोहल्ला, बिरसा मुंडा चौक, आदिवासी उत्सव समितीच्या मान्यवरांनी गोटूल भवनातील आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून समोरील पटांगणात सप्तरंगी ध्वजारोहण करण्यासाठी आदिवासी समाज बांधव,विविध विभागाचे अधीकारी, कर्मचारी महिलांनी मोठ्या संख्येने एकत्रित आले होते.
गावातून पारंपरिक पद्धतीने वाजंत्री, पिवळ्या रंगाचा परिधानांने रेला नृत्य सादर करत भव्य रॅली काढण्यात आले. त्यानंतर वीर बाबुराव शेडमाके चौकात मार्गदर्शन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमात अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम,प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते कैलाश कोरेत, आदिवासी एम्पलाईज फेडरेशनचे अध्यक्ष नामदेव आत्राम, विशेष अतिथी म्हणून पेसा अध्यक्ष स्वामी वेलादी,उपसरपंच विनोद अकनपल्लीवार, वनहक्क समिती अध्यक्ष देवाजी सिडाम,वीर बाबुराव स्मृती समितीचे अध्यक्ष भीमराव आत्राम,ग्रामपंचायत सदस्य मनोज बोल्लूवार,सोमेश्वर रामटेके, संतोष अर्का, विजय कुसनाके ,अनुसया सप्पीडवार, माया कोरेत, सुगंधा मडावी, शारदा कडते,पेसा महिला सदस्या प्रिती इष्टाम, मीराबाई सडमेक,बुधाबाई नैताम, सुनीता मडावी, प्रतिष्ठित नागरिक ईश्वर वेलादी,बाबुराव कोरेत, मुरलीधर सडमेक,रावजी नैताम,नागोराव सिडाम ,प्रभाकर आत्राम, वासुदेव आलाम,विनायक अर्का, नानाजी सोयाम, रेखचंद मेश्राम, राजेंद्र पेंदोर ,भिऊजी कोरेत, रघुपती सिडामआदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन व प्रास्ताविक अल्काताई कोरेत यांनी केले आणि आभार सुरपाम मॅडम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज सडमेक,योगेश कंनाके,सुनिल कुमरे उमेश आत्राम, दीपक मडावी,बिचू उरेत,राजेंद्र सिडाम आकाश आत्राम, करण आलाम ,लक्की सडमेक,संदिप उरेत, सोहन आलाम, अक्षय मडावी, दिपक कंनाके,करण आत्राम, छोटू आत्राम,संतोष कोरेत, दिपक मेश्राम,चंद्रकला आत्राम, कल्पना उरेत, इंदिरा सडमेक,योगिता कोरेत, ज्योती मडावी, मंजुळा मडावी, दुर्गाबाई उरेत, लिलाबाई आत्राम,अमसाबाई तोडसाम सीमा मडावी, वंदना मडावी,पार्वती सडमेक,लक्ष्मी आत्राम, यशोदा तलांडे अक्षताआत्राम,पायल कोरेतआदींनी परिश्रम घेतले.