अहेरी : एसटी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित असून त्यांना अनेक अडचींना सामोरे जावे लागत आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात आपण नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यापुढेही या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती,अहेरीचे सभापती अजय कंकडालवार यांनी केले.
एस.टी.महामंडळाच्या अहेरी आगारात एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेतर्फे ९ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.यावेळी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे विविध पदाधिकारी,तसेच अहेरी आगारातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी जि प अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा,वीर बाबुराव शेडमाके,छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यांनतर एस.टी.कर्मचाऱ्यांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आले.