वरोरा : – महाराष्ट्र कृषी विद्यापीठा द्वारे दरवर्षी राबविल्या जाणाऱ्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत आसाळा ग्रामस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित महारोगी सेवा समिती व्दारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन, वरोरा च्या सातव्या सत्रातील कृषी दुतांनी भेट दिली व समस्त ग्रामस्थानिकांनी त्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची व आधुनिक शेतीचा अवलंब करण्याची पद्धत बाबतची माहिती कृषी दुतांच्या माध्यमातून ग्रामस्थानी पोहोचवली जाते व या मार्फत कृषी विद्यार्थानांना प्रात्यक्षिक कृषी शिक्षण प्राप्त होण्यास मदत होते. या कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांनी अनुभवलेल्या प्रात्याक्षिक समस्या कृषी दुतांमार्फत कृषी महाविद्यालय आणि कृषी विभागापर्यंत पोहोचण्यास मदत होते. त्याचबरोबर शेतकरी वार्षिक कृर्षी उत्पादना – मध्ये वाढ होते.
आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पोटदार कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. वी. महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन पंचबाई अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी आसाळा येथे कृषी दुत आदित्य मंगर, अनिकेत तागडे, पृथ्वीराज चव्हाण, यश आश्राम, अमन राठोड, आदित्य जलमकर उपस्थित होते .