गडचिरोली:अहेरी येथील सहाय्यक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अंकित यांचे जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून स्थानांतरण झाल्यावर त्यांच्या ठिकाणी वैभव वाघमारे यांनी 24 जुलै रोजी पदभार स्वीकारला.
जनसामान्यांच्या प्रश्नांना अग्रक्रम देऊन पारदर्शक प्रशासकीय कारभार हाताळणारे कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.वैभव वाघमारे हे पर्यवेक्षदिन कालावधीत वाशीम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथील नगरपरिषदचे मुख्याधिकारी त्यानंतर मंगळूरपीर चे तहसीलदार पदाची धुरा सांभाळली.2022 मध्ये त्यांनी अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात सहाय्यक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी म्हणून उत्तम कामगिरी बजावली.नुकतेच 21 जुलै रोजी झालेल्या बदल्यांमध्ये त्यांना अहेरी येथील कारभार सोपविण्यात आले.त्यांनी 24 जुलै रोजी कार्यभार स्वीकारला आहे.
विशेष म्हणजे त्यांनी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथे आदिवासींचा जीवनमान उंचावण्यासाठी मोह फुलांची बँक उपक्रम राबविला होता. मेळघाटातील जंगलात मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंचे उत्पादन होत असते. मोहा,तेंदूपाने, टेंभरु,चारोळी, आवळा,डिंक,हिरडा, बेहडा,मशरूम,बांबूसह, आदी खाद्यपदार्थ ,रानभाज्या मोठ्या प्रमाणात आढळतात. यांची विक्री सामूहिकपणे ग्रामस्थरावर केल्यास स्थानिक लोकांना आर्थिक मदत होऊ शकेल याशिवाय वैयक्तिक व सामूहिक योजनांचे क्रियांवर सुद्धा मोहा बँक मार्फत झाल्यास योजनांचे फलित उत्तम होईल या उदात्त हेतूने त्यांनी मोहफुल बँक हा ड्रिम प्रोजेक्ट राबविला होता.
नुकतेच झालेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये त्यांची अहेरी येथे नियुक्ती झाली. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभाग सुद्धा अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखला जातो. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख असून मेळघाटातील त्यांचा अनुभव गडचिरोलीसाठी कामी येणार आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांना त्यांचा मोठा फायदा होऊ शकतो.
अहेरी प्रकल्प कार्यालय अंतर्गत मुलचेरा,अहेरी आणि सिरोंचा या तीन तालुक्यांचा समावेश आहे.उपविभागीय कार्यालय अंतर्गत अहेरी आणि सिरोंचा या दोन तालुक्यांचा समावेश आहे.निवडणूक कामकाजात मुलचेरा,अहेरी आणि सिरोंचा या तीन तालुक्यांचा कामकाज त्यांना सांभाळावे लागणार आहे हे विशेष.