संचालक मंडळाच्या पाठपूराव्याला यश
गोंडपिपरी :- शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी मक्का खरेदी केंद्राची मागणी केली.संचालकांच्या पाठपूराव्याला यश आले.आणि गोंडपिपरीत मक्का खरेदी केंद्र सुरु झाले.मागिल आठवड्यात शुभारंभही झाला.मात्र मानापमानाचा विषय आड आला.सत्ताधाऱ्यांनी अधिकारक्षेत्राच्या बाहेर जाऊन खरेंदी केंद्राचा शुभारंभ केल्याचा आरोप विरोधी गटातील संचालकांनी केला.मात्र पोर्टल बंद राहिल्याने शुभारंभानंतर खरेदी बंद राहिली.यादरम्यान गोंडपिपरी बाजार समितीच्या सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी रविवारी ना.सुधिर मुनगंटिवारांची भेट घेतली.पालकमंत्री मुनगंटिवारांच्या दनक्याने यंत्रणा पुरती हादरली.आणि सोमवारपासून गोंडपिपरीतील मक्का खरेदी आत्ता पुर्ववत सुरु झाले.यामूळे विक्रीसाठी आॕनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला.
गोंडपिपरीची मदार शेतीवर आहे.धान,कापूस,तुळ,मक्का यासारख्या पिकांचे उत्पन्न घेऊन येथिल नागरिक आपले जिवन जगतात.यातून कुटूंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांचा रोजचा संघर्ष सुरु आहे.असे असतांना तालुक्यात उत्पन्न होणाऱ्या मालाला खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना विक्रीसाठी भटकावे लागते.यामूळे गोंडपिपरी तालुक्यात मक्का खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी बाजार समितीच्या संचालकांनी केली.माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांच्या नेतृत्वात पालकमंत्री सुधिर मुनगंटिवार यांच्याकडे निवेदन दिले.या पाठपुराव्याला यश आले.आणि गुरुवारपासून मक्का खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला.सुरवातीला आलेल्या शेतकऱ्यांच्या मालाचा काटा झाला.शाल,श्रिफळ देऊन सत्कारही झाला.सभापती ईंद्रपाल धुडसे यांच्या हस्ते केंद्राचा श्रिगणेशा झाला.मात्र मानापमानाचा विषय आड आला.सत्ताधाऱ्यांनी अधिकारक्षेत्राच्या बाहेर जाऊन खरेंदी केंद्राचा शुभारंभ केल्याचा आरोप विरोधी गटातील संचालकांनी केला.मात्र पोर्टल बंद राहिल्याने शुभारंभानंतर शुक्रवार आणि शनिवारी खरेदी बंद राहिली.यादरम्यान बाजार समितीच्या सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी रविवारी ना.सुधिर मुनगंटिवारांची भेट घेतली.पालकमंत्री मुनगंटिवारांनी जिल्हा मार्केटींग अधिकारी आणि खरेदी करणाऱ्या संस्थेच्या व्यवस्थापकाला धारेवर धरले.ना.मुनगंटीवारांच्या दनक्याने यंत्रणा पुरती हादरली.आणि सोमवारपासून गोंडपिपरीतील मक्का खरेदी आत्ता पुर्ववत सुरु झाले.यामूळे विक्रीसाठी आॕनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला आहे.मुनगंटीवारांना भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात बाजार समितीचे सभापती ईंद्रपाल धूडसे,उपसभापती स्वप्निल अनमुलवार,भाजपचे तालुकाध्यक्ष बबन निकोडे,कृउबासचे संचालक निलेश पुलगमकर,गणपती चौधरी(गुरुजी),चंद्रजित गव्हारे,संदिप पौरकार,समिर निमगडे,साईनाथ मास्टे आदिंची उपस्थिती होती.