आरोग्य शिबीराकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेला वरिष्ठांची शोकाज
गोंडपिपरी- (सुरज माडुरवार)
मानव विकास कार्यक्रम अंतर्गत गरोदर माता व बालआरोग्य तपासणी शिबीर दर माह प्राथामिक आरोग्य केंद्रात दोन शिबीर घेणे आवश्यक आहे.परंतू मे २०२३ या महिण्यात गोंडपिपरी तालुक्यातील तिन प्राथमिक आरोग्य केंद्रात या स्वरूपाचे एकही शिबिर आयोजित करण्यात आले नाही.यामुळे ६ महिने वयोगटातील बालके व गरोदर तसेच स्तनदा मातेची आरोग्य तपासणी झाली नाही.त्यामुळे त्यांच्या आरोग्याबद्दल तालुका आरोग्य विभाग बेफिकीर असल्याचे निदर्शनास येते.वास्तवीक पाहाता ग्रामिण भागातील गरोदर,स्तनदा व ते ६ महिने वयोगटातील बालकांना नियमीत तज्ञ डॉक्टराकडून आरोग्य तपासणी होणे आवश्यक असताना शिबीर न आयोजित करता याबाबत अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले असून ही अत्यंत गंभिर बाब आहे.त्यासाठी येथील तालुका आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक स्वास्त केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना जबाबदार घरून जिल्हा आरोग्य अधिकारी नी त्यांना शोकाज दिली आहे.
गोंडपिपरी येथील तालुका आरोग्य अधिकारी यांनी वैद्यकिय अधिकारी यांचेशी समन्वय साधून व नियोजन करून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दरमहा दोन गरोदर माता व बाल आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्याची गरज होती.या शिबीरात जास्तीत जास्त गरोदर माता व बालके यांची आरोग्य तपासणी केली जाईल याकडे गांभियांने लक्ष द्यावे,अशा सुध्दा त्यांना शासनाच्या सूचना आहेत.त्याचवेळी कोणत्याही परिस्थितीत हे शिबिर रदद होणार नाही,याची काळजी आरोग्य विभागांना घ्यायची आहे.उरलेल्या तारखेलाच शिबीर होतील याची खबरदारी घ्यावी,अशा सूचना आहेत.शिबीराच्या तारखेबाबत प्रा.आ.केंद्राअंतर्गत गावात प्रचार व प्रसार करण्याची गरज आहे.दरम्यान आरोग्य तपासणी शिबीर का आयोजित केले नाही,असा प्रश्न जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आपल्या पत्रातून विचारला आहे.हा गंभिर प्रकार असून त्यासाठी आपल्याविरुदध आवश्यक प्रशासकिय कार्यवाही का करण्यात येऊ नये,याचा स्वंयस्पष्ट खुलासा शिकाज प्राप्त झाल्याच्या दोन दिवसाचे आत सादर करावा असे कळविल्याने तालुका आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
डिझेल भरायला पैसे नाही पेट्रोलपंपावर अडकली गर्भवती या मथळ्याखाली आरोग्य विभागाचा गलथान कारभार दि.१ (गुरुवारी) बतमीदारांनी उघडकीस आणला. बातमीची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी समंधीत विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना शोकाज दिले आहे.धाबा प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी डॉ चकोले यांच्यावर काय कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे
करंजीतील शिबीर संशयाच्या भोवऱ्यात….
मागील महिन्याभरापूर्वी करंजीत मानव विकास कार्यक्रम अंतर्गत गरोदर माता व बाल आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.त्या शिबारात गोंडपिपरी येथील दोन शिबिर व करंजीतील एक शिबीर अशा तीन शिबीर एकाच कार्यक्रमात आटोपल्याने आर्थिक अनियमितता झाली असल्याची शंका नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे .