चंद्रपूर-गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पार पडलेल्या निवडणुकीत आज (दिनांक ३०एप्रिल) मतदान मोजणीप्रक्रिया अंती भाजपला निर्विवाद यश मिळाले असून काँग्रेसला जबर धक्का बसला आहे.
सेवा सहकारी क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३० एप्रिल रोजी कला वाणिज्य महाविद्यालय येथे पार पडली पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर निकाल घोषित केला गेला यात माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार व वैष्णवी बोडलावार यांच्या नेतृत्वात भाजप समर्थित शेतकरी विकास पॅनलने अनेक वर्षाच्या काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावीत १२ जागेवरती विजय मिळवला तर काँग्रेसला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपकडून व्यापारी गटातून सुहास माडुरवार व रितेश वेगीनवार तर मापारी हमाल गटातून विजय पेरकावार यांनी विजय मिळवला. ग्रामपंचायत गटातून चार पैकी तीन जागेवर भाजप चे उमेदवार निवडून आले.समीर निमगडे चंद्रजीत गवारे संदीप पोरकार हे विजय झालेत. तर सेवा सहकारी गटातून स्वप्निल अनमुलवार,महेंद्रसिंह चंदेल,निलेश पुलगमकर, इंद्रपाल धुडसे,संजना अम्मावार,गणपत चौधरी यांनी बाजी मारली. काँग्रेसचे निलेश संगमवार देविदास सातपुते, अशोक रेचनकर ,प्रेमीला चणेकर, संतोष बंडावार ,नारायण वागदरकर विजयी झाले असून पहिल्यांदाच ताकतीने उतरलेल्या अमर बोडलावार यांच्या नेतृत्वात भाजप ने घवघवीत यश मिळवित बाजार समितीवर आपला झेंडा फडकावला..