भद्रावती : स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे संस्थापक सचिव स्व. निळकंठराव शिंदे यांच्या पुण्यस्मरण निमित्त भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती अंतर्गत निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती, मातोश्री नीलिमाताई शिंदे महिला महाविद्यालय , डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय भद्रावती व कै. निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ जानेवारी २०२३ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत होणाऱ्या ऊर्जा न्यूज फेस्टिवल मध्ये दिनांक १२ जानेवारी रोजी भव्य ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते
सर्वप्रथम महाविद्यालयात ग्रंथ दिंडीचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव कार्तिक शिंदे, सहसचिव विशाल , प्राचार्य डॉ. एल एस लडके यांनी सर्वप्रथम ग्रंथ पूजन केले
या प्रसंगी डॉ. विवेक शिंदे यांनी मानवी जीवनात ग्रंथाचे महत्व यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर टाळ मृदंग ढोल ताशाच्या निनादात आणि ग्रंथाचा गजर करत ग्रंथ दिंडी महाविद्यालयाच्या परिसरातून मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करीत निघाली या ग्रंथदिंडीमध्ये महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मार्गक्रमण करणारे नागरिक काव्यरसिक मंडळी, साहित्य प्रेमी , लेझीम पथक उत्साहाने सहभागी झाले होते
ग्रंथदिंडीच्या अग्रस्थानी एनसीसी चे विद्यार्थी, नऊवारी प्रधान केलेले विद्यार्थिनी व त्यांच्यासोबत ग्रंथदिंडी व त्यामागे लेझीम पथक व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विविध थोर मराठी संत साहित्यिक यांच्या घोषणा देत ग्रंथदिंडी मुख्य मार्गावरील मार्गक्रमण करीत नागमंदिर परिसर व परत महाविद्यालय अशाप्रकारे ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते
या ग्रंथदिंडीमुळे भद्रावती व आजुबाजुचा परिसर संतवाणीने दुमदुमला होता व या ग्रंथदिंडीमुळे भद्रावतीच्या नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता.