अहेरी:- स्थानिक खेळाडूंचा खेळ पाहिला, अतिशय उत्कृष्ट खेळतात.कुठल्याही स्पर्धेसाठी आवश्यक फिटनेस ठेवल्यास खेड्यापाड्यातील खेळाडू देखील उच्च पातळीवर चमकदार कामगिरी करू शकतात. त्यांच्यासाठी मेट्रो सिटीतील खेळाडूंप्रमाणे फिजिकल ट्रेनिंग आवश्यक आहे. एकाग्रतेने खेळल्यास या खेळाडूंना पुढे जाण्यास कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.उमानूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मोंडीगुट्टा येथे जयसेवा क्लब तर्फे आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी सहाय्यक उडघाटक म्हणून माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून उमानूरचे सरपंच श्रीनिवास गावडे,प्रमुख अतिथी म्हणून मरपल्ली पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी संतोष जायभाय, मरपल्लीचे सरपंच अरुण वेलादी,उमानूर चे उपसरपंच रवींद्र कोरेत,सामाजिक कार्यकर्ते आनंदराव गावंडे,यशवंत डोंगरे,ग्रा प सदस्य राकेश वेलादी,तिरुपती गेडाम,मदनय्या गेडाम,सोमेश्वर गेडाम,व्यंकटस्वामी गेडाम,प्रेमीला गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ आत्राम यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात क्रीडाकौशल्य दडलेला आहे.त्यांना प्रोत्साहन देऊन विविध क्रीडास्पर्धामध्ये संधी दिल्यास अनेक उत्कृष्ठ खेळाडू बाहेर पडतील.केवळ त्यांना दिशा देणारे प्रशिक्षक हवं आहे.ग्रामीण खेळाडूमध्ये खेळाची आवड निर्माण करण्यासाठी अशाप्रकारे स्पर्धांची आयोजन करने आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी भाग्यश्री आत्राम यांनी सर्व खेळाडूंना होणाऱ्या व्हॅलीबॉल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.तर आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्पर्धेत व्हॅलीबॉल खेळून युवा खेळाडूंमध्ये ऊर्जा केली.यावेळी उपस्थित खेळाडूंनी सुद्धा आ धर्मराव बाबा आत्राम यांच्याशी व्हॅलीबॉल खेळाचा आनंद लुटला.