भद्रावती : तालुक्यातील पिपरी (दे.) येथून शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांना पुढील उपचाराकरीता वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात आज (दि.२१) ला पाठविण्यात आले.
नुकतेच दिनांक १४ नोव्हेंबर रोजी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियाना अंतर्गत भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबीर तालुक्यातील पिपरी (दे.) येथे संपन्न झाले होते.
या शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी झाली. तपासणी झालेल्या रुग्णांपैकी ५४ रुग्णांना आज (दि.२१) रोज सोमवारला पिपरी येथुन पुढील उपचाराकरीता सावंगी (मेघे) येथील रूग्णालयात ट्रस्टच्या माध्यमातून विशेष निःशुल्क बससेवेव्दारे पाठविण्यात आले.
या आरोग्यसेवेची ट्रस्टच्या माध्यमातून संपुर्ण जबाबदारी संदीप कुटेमाटे, अनूप कुटेमाटे व पिपरी येथील कार्यकर्ते यांनी पार पाडली.