गोडपिपरी-(सुरज माडुरवार)
शेतातील शेततळ्यात बुडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज दि.(१७) गुरुवारी घडली.
गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील लक्ष्मण कंकलवार यांच्या शेतातील शेत तळ्यातील मोटार काढण्यासाठी मजुरांना बोलवण्यात आले होते.त्यापैकी नंदू धोंडू गणेशकर वय (४५) हे शेततळ्यात सकाळच्या ८ च्या सुमारास उतरले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने गाळातच फसून राहिले सदर माहिती ठाणेदार यांना देण्यात आली.ठाणेदार जीवन राजगुरू, तहसीलदार के डी मेश्राम यांनी घटनास्थळ गाठून शोधमोहीम राबवली असता सायंकाळी ६ च्या सुमारास नंदू गणेशकर यांचा मृतदेह आढळला.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून पुढील तपास गोंडपीपरि पोलीस करत आहे.मृतक नंदूच्या पच्यात पत्नी ,वडील,दोन मुले असून भंगाराम तळोधित हळहळ व्यक्त केल्या जात आहे.शेततळ्यात मोटर काढताना विद्युत पुरवठा सुरू होता नंदूचा करंट लागून मृत्यू झाल्याची चर्चा नागरिकांत असून उत्तरीय तपासणीनंतरच सत्य समोर येईल पुढील तपास ठाणेदार राजगुरू यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी पोलीस करत आहे.