वरोरा:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या अनुषंगाने वरोरा शहरांमध्ये जनजागृती व वातावरण निर्मिती करण्यासाठी काँग्रेसतर्फे आज शनिवारी बाईक रॅली काढण्यात आली.
खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांचे नेतृत्वात निघालेल्या या रॅलीत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह गावातील विविध सामाजिक, क्रीडा संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.
खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा विदर्भात दाखल झाली आहे. नांदेड, वाशिम, अकोला असा मार्गक्रमण करणार आहे. त्यासाठी संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबवून जागृती करण्यात येत आहे. याच यात्रेचा एक भाग म्हणून सद्भावना चौकातून बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीच्या निमित्ताने शहरांमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला समर्थन जाहीर झाले. शिवाय अनेक संघटना, नागरिकांनी पाठिंबा दर्शवून या यात्रेचा सन्मान केला आहे.
आजच्या रॅलीत रोटरी क्लबचे पराग पत्तीवार, अमित लाहोटी गांधी उद्यान मंडळाचे नरेंद्र नेमाडे, दादा जयस्वाल इन्फिनिटी रायडर्स क्लबचे डॉ. सागर वझे,जिल्हा संघर्ष समितीचे प्रवीण धनवलकर, प्रवीण सुराणा सदभावना मंडळाचे गोपाल गुडधे, सरकार ग्रुपचे कासिफ खान, छावा ग्रुपचे राहुल नन्नावरे, माॅर्नींग वाॅक ग्रुपचे देविदास अंबीकर, वरोरा स्पोर्ट्स फाऊंडेशनचे गजानन जिवतोडे व व्यापारी बंधु सहभागी झाले होते. माजी नगराध्यक्ष विलास टिपले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, माजी सभापती राजेंद्र चिकटे,रवींद्र धोपटे, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, राजू महाजन, छोटूभाई शेख,निलेश भालेराव, अनिल झोटिंग, प्रदीप बुराण, प्रमोद मगरे,बसंत सिंग,रूपेश तेलंग, शहर महीला काँग्रेसध्यक्षा दिपाली माटे, सरपंच यशोदा खामनकर, सुनंदा जिवतोडे,शिरोमणी स्वामी,मिना रहाटे, युवक काँग्रेसचे शुभम चिमूरकर, राजू मिश्रा, मनोहर स्वामी,आसीफ रजा,सुभाष दांदले,राहुल देवडे,सलीम पटेल,सन्नी गुप्ता,पंकज नाशिककर,डाॅ. शालीक झाडे,ईस्तेखां पठाण,संजय घागी,विजय पुरी, पराग नरडे,प्रमोद काळे,शैलेश पदमगिरवार आदी सहभागी झाले होते.