वरोरा/भद्रावती : कोरोणा प्रादुर्भावाच्या काळापासून स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे वरोरा व भद्रावती तालुक्यात आरोग्य, सामाजिक, क्रीडा, अभ्यासिका, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, युवा आदी क्षेत्रात भरीव असे कार्य सुरू आहे. सहकार व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले रवि शिंदे यांनी या ट्रस्टची लोकोपयोगी कार्याकरीता स्थापना केली आहे. ते ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ट्रस्टद्वारे ग्रामीण व शहरी भागात श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान सुरु आहे. दिव्यांगाणा सायकल वाटप, कॅन्सर व दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना मदतकार्य, कोरोनाणे मृत, आत्महत्याग्रस्त, निराधार, गरीब गरजू पालकांच्या पाल्यांचा मोफत विवाह सोहळा, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक योजना, गावागावात अभ्यासिकेला पुस्तक भेट व आर्थिक सहकार्य, शेतकरी, शेतमजूर, पाळीव प्राणी यांना मदतकार्य, अवैध व्यवसाय मुक्त गाव अभियान, क्रीडा स्पर्धा, लघु व्यावसायिकांना मदत, आत्महत्येच्या मार्गावर असलेल्यांना धीर देण्याचे कार्य, सामाजिक जागृती हेतूने विविध बौध्दिक मार्गदर्शनपर उपक्रम, युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा स्पर्धा, आदी विविधांगी कार्य सुरू आहेत. व दिवसेंदिवस ट्रस्टच्या कार्याचा आलेख वाढत आहे. अनेक लोकोपयोगी सामाजिक कार्याची भर पडत आहे व ट्रस्टचा आवाका वाढत आहे. त्यानुसार ट्रस्टला जिल्हाभरातून विविध क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आले आहे.
या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या कार्यकारी अध्यक्षपदी उच्चविद्या विभूषित सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनराज कान्होबाजी आस्वले यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. धनराज कान्होबाजी आस्वले यांचा भद्रावती तालुक्यातील देऊरवाडा या गावातून प्रवास सुरू झाला. त्यांनी वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केलेले असून त्यांचे बी.एड., एम.फिल. झाले आहे. व सध्या ते समाजशास्त्र विषयात एम.ए. करीत आहे. सहकार व शिक्षण क्षेत्रात त्यांच्या आयुष्याची कारकीर्द गेली. परदेशात बहरीन येथे छत्तीस वर्षे त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली. जगभरात एकोणचाळीस देशांना त्यांनी भेटी दिल्या. राष्ट्रहीत व समाजहित जोपासत त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे.
अशा अनुभवी व उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्त्वाचे मार्गदर्शन ट्रस्टला लाभत होते. आता त्यांची नियुक्ती ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून करण्यात आल्याने त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून अभीनंदन होत आहे. या नियुक्तीने त्यांच्या अनुभवाचा फायदा येथील ग्रामीण भागातील जनतेला होणार आहे.