गोंडपिपरी (सुरज माडुरवार) : गोंडपिपरी ते धाबा मार्गाचे काम अडीज वर्षांपासून कासवगतीने सुरू असून ठेकेदाराच्या चुकीमुळे दिवसेंगणिक अपघातात वाढ होत आहे.रस्ता झाल्याने धाबा-पोडसा परिसरातील हजारो लोकांचे कल्याण होईल अशी अपेक्षा होती. पण आता हाच मार्ग नागरिकांच्या जिवावर बेतला आहे.रस्त्यावर असलेले शेकडो खड्डे,रस्त्यावर पसरलेली गिट्टी ,प्रशासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष यासाठी कारणीभूत ठरत आहे.अनेक तरुणांच्या वाट्याला अपंगत्व आले मार्गावरून प्रवास करताना कमालीची भिती निर्माण झाली आहे.समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा तर्फे डोंगरगाव येथे आज दि.(१८) मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करन्यात आले.यावेळी लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे,निकृष्ट कामाची चौकशी करावी आदी मागण्या करण्यात आल्या यावेळी माजी जी प सदस्य अमर बोडलावार,वैष्णवी बोडलावार,सरपंच निलेश पुलगमकर,नंदा घोगरे,दीपक सातपुते,हिराचंद कंदनुरिवार, अरुण कोडापे,गणपती चौधरी,स्वप्नील अनमूलवार,किशोर अगस्ती,परशुराम कुबडे,राजेंद्र गोहणे,बाबुराव बोंमकंटीवार,संजय येलमुले,दिनेश कुतरमारे,लक्ष्मण येलमुले,आशिष माणेडपल्लीवर,चपंत कोसरे,विलास वाघडे,आदित्य रायपुरे,गौतम कोरडे,गोसाई धुडसे,संतोष धुडसे,देवा मुंजनकर यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती