बेस्ट पॉवर लिफ्टर, टीमचॅम्पीयनशिप, स्मार्ट रेफरी, बेस्ट ड्रेस्ड व डिसिप्लीन्ड प्लीअर्सची निवड
– क्रीडा रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद –
भद्रावती :- स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचंद्रपूरच्या विद्यमाने स्थानिक श्री मंगल कार्यालयात १३ ते १६ ऑक्टोंबर या कालावधीत देश पातळीवरील पॉवरलिफ्टींग चॅम्पीयनशिपचे आयोजन करण्यात आले. या चॅम्पीयनशिपला स्थानिक व ठिकठिकाणावरून आलेल्या क्रीडा रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. आज दि. १६ ऑक्टोंबर रोजी या चॅम्पीयनशिपचा शानदार समारोप पार पडला. या चॅम्पीयनशिपमध्ये पॉवर लिफ्टींगचे अनेक राष्ट्रीय रेकार्ड निर्माण केले.
या स्पर्धेत बेस्ट लिफ्टर म्हणून सिनियर पुरुष गटातून प्रथम हरियाणाचे गुरविंदर सिंग, द्वितीय तामिळनाडूचे प्रकाश बी.तृतीय दिल्लीचे रजत रावत पात्र ठरले. सिनियर महिला गटातून प्रथम महाराष्ट्राच्या अंकिता पोखरे आणि द्वीतीय सुश्मिता देशमुख तसेच तृतीय जम्मू काश्मीरच्या अमिता देवी पात्र ठरल्या. मास्टर एक पुरुष गटातून प्रथम हरियाणाचे संदीप कुमार, मास्टर दोन पुरुष गटातून प्रथम झारखंडचे बिनोद कुमार पात्रा, मास्टर तीन पुरुष गटातून प्रथम पश्चिम बंगालचे बासुदेब दास, मास्टर चार पुरुष गटातून प्रथम केरळचे सी. प्रेमचंद्रन, मास्टर एक महिला गटातून प्रथम महाराष्ट्राच्या नीता मेहता, मास्टर दोन महिला गटातून प्रथम महाराष्ट्राच्या विनुथा रघुनाथ, मास्टर तीन महिला गटातून प्रथम आसामच्या बिद्या फुकन या विजयी ठरल्या.
टीम चॅम्पियनशीप विभागामध्ये सिनियर पुरुष गटात प्रथम तामिळनाडू, द्वितीय हरियाणा व तृतीय महाराष्ट्र, सिनियर महिला गटातून प्रथम महाराष्ट्र, द्वितीय मध्य प्रदेश व तृतीय ओडीसा, सिनियर ओव्हरऑल गटातून प्रथम महाराष्ट्र, द्वितीय मध्यप्रदेश व तृतीय ओडीसा. मास्टर पुरुष ओव्हर ऑल गटातून प्रथम केरळ, द्वितीय मध्यप्रदेश व तृतीय महाराष्ट्र, मास्टर महिला ओव्हर ऑल प्रथम गटातून मणिपूर, द्वितीय महाराष्ट्र, तृतीय मध्य प्रदेश या राज्यातील टीम विजयी झाल्या.
या स्पर्धेत मध्यप्रदेशच्या शिव गोपाल पांडे, महाराष्ट्राच्या देवदत्त भोईर, मणिपूरच्या सुशीला देवी यांनी उत्तम पंच म्हणून कामगिरी केली. बेस्ट ड्रेस्ड व डिसिप्लीन्ड प्लीअर्समध्ये प्रथम आसाम, द्वीतीय मनिपूर व तृतीय पश्चीम बंगाल राज्याने स्थान प्राप्त केले.
समारोपीय कार्यक्रमात स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे, प्रा.धनराज आस्वले, प्रेमदास पा.आस्वले, बी.एम. देहारकर, दत्ता बोरेकर, प्रा. रविकांत वरारकर, पॉवर लिफ्टिंग इंडियाचे सचिव अर्जुन पुस्कार प्राप्त पी.जे. जोषेफ, उपाध्यक्ष पुरण सिंग, विदर्भ पॉवर लीफ्टींग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश पाचपोर, विदर्भ पॉवर लीफ्टींग असोसिएशनचे सचिव सचिन माथणे, विदर्भ पॉवर लीफ्टींग असोसिएशनचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार किशोर बागडे, जिल्हा शक्तित्तोलन असोसिएशनचे उपाध्यक्ष रवींद्र गुरूनुले, आदींच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने खेळाडू व क्रीडा प्रेमी उपस्थित होते.
विशेष म्हणजे भद्रावतीत ऐतिहासिक नगरीत पार पडलेल्या देश पातळीवरील पॉवरलिफ्टिंग चॅम्पीयनशिपमधील विजेत्या ठरलेल्या खेळाडूंची दुबई येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय पॉवरलिफ्टींग चॅम्पीयनशिपसाठी निवड करण्यात येणार आहे. या चॅम्पीयनशिपमध्ये
देशाच्या विविध राज्यातून सहाशे पॉवरलिफ्टर्सचे भद्रावतीत आगमन झाले होते. यात सुमारे दोनशे तीस महिला पॉवर लिफ्टर्सचा सहभाग होता.. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सुमारे सत्तर टक्के पॉवरलिफ्टर्स उच्च पदावर कार्यरत आहे. यातील काही आयएएस आणि आयपीएस दर्जाचे अधिकारी सुध्दा आहे. यामधील ११७ पॉवरलिफ्टर्स आंतरराष्ट्रीय दर्जाचे होते.
स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चार दिवशीय उपक्रमांतर्गत देशपातळीवरील पॉवर लिफ्टींग चॅम्पीयनशिप, भव्य प्रेरणा रॅली,वरोरा -भद्रावती तालुक्यातील युवकांच्या कबड्डी स्पर्धा,रक्तदान शिबिर, दिव्यांग बंधु -भागिनींना तीन चाकी साईकील वाटप, गुणवंतांचा सत्कार व युवकांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे या उपक्रमाला चंद्रपूर जिल्हासह इतर ठिकाणच्या विविध मान्यवर मंडळींनी भेटी दिल्या.